बातमी/ सारांक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:28 IST2021-02-05T05:28:54+5:302021-02-05T05:28:54+5:30

अमरावती: स्थानिक वडाळी नागरी वस्तीतील रस्ता उखडला आहे. बांबू गार्डनकडे जाणारा मार्ग पूर्णत: नादुरुस्त असताना या मार्गाच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे ...

News / Summary | बातमी/ सारांक्ष

बातमी/ सारांक्ष

अमरावती: स्थानिक वडाळी नागरी वस्तीतील रस्ता उखडला आहे. बांबू गार्डनकडे जाणारा मार्ग पूर्णत: नादुरुस्त असताना या मार्गाच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे लक्ष नाही, असे चित्र आहे. लोकप्रतिनिधींच्या लेखीसुद्धा हा मार्ग दुर्लक्षित असल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे.

--------------------------

बडनेरा जुनी वस्तीत रस्ते निर्मिती

अमरावती : बडनेरा जुनी वस्ती सावता मैदान ते टी पॉईंट या दरम्यान सिमेंट रस्ते चौपदीकरणाची कामे वेगाने सुरू आहेत. त्यामुळे अमरावती- बडनेरा मार्गावरील वाहतूक विकस्ळीत होत आहे. जुनी वस्तीला बहुतांश वेळा ट्रॅफिक जाम ही नित्याचीच बाब झाली आहे.

----------------------

कारागृह भिंतीलगत संरक्षण कुंपण नाही

अमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहाच्या भिंतीलगत चांदूर रे्ल्वे मार्गाच्या बाजूने संरक्षण कुंपणाचा अभाव आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक खुल्या जागेवर कचरा, घाण आणून टाकत असल्याचे वास्तव आहे. संरक्षण कुंपणाअभावी सागवान वृक्ष व अन्य झाडांची चोरीदेखील होत आहे.

---------------------------------

ऑक्सिजन पार्कसमाेर मिनी कचरा डेपो

अमरावती : येथील जुने बायपासलगतच्या ऑक्सिजन पार्कसमोरील भागात मिनी कचरा डेपो तयार करण्यात आला आहे. महापालिका सफाई कर्मचारी परिसरातून गोळा झालेला कचरा याच भागात आणून टाकतात. त्यामुळे ऑक्सिजन पार्कसमोर कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

-------------------------------

विश्रामगृह ते नवीन बायपासलगत रस्ता नादुरुस्त

अमरावती : बडनेरा नवीवस्तीच्या विश्रामगृह ते नवीन बायपास वळण रस्ता वर्षभरातच उखडला आहे. या रस्त्याच्या निर्मितीसाठी डांबर वापरले की नाही, असा सवाल आता उपस्थित होत आहे. या मार्गावर जागोजागी पडलेले खड्डे हे संबंधित अभियंत्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह लावणारे आहे. रस्त्यावरील खड्डे बुजवावे, अशी मागणी आहे.

Web Title: News / Summary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.