बातमी / सारांक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:28 IST2021-02-05T05:28:27+5:302021-02-05T05:28:27+5:30

अमरावती : माहुली चोर ते शिवणी रसुलापूर दरम्यान यवतमाळ रस्ता उखडला आहे. रस्त्यावर जागोजागी खड्ले असताना, सार्वजनिक बांधकाम विभाग ...

News / Summary | बातमी / सारांक्ष

बातमी / सारांक्ष

अमरावती : माहुली चोर ते शिवणी रसुलापूर दरम्यान यवतमाळ रस्ता उखडला आहे. रस्त्यावर जागोजागी खड्ले असताना, सार्वजनिक बांधकाम विभाग खड्डे बुजवत नाही, याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या मार्गाची जबाबबदारी असलेल्या अभियंत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आहे.

--------------------------------

दीक्षांत समारंभाची लगबग सुरू

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात २१ फेब्रुवारी रोजी ३७ वा दीक्षांत समारंभ होऊ घातला आहे. केंद्रीय भृपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रशासनाने दीक्षांत समारंभाची तयारी जोरदार सुरू केली आहे. पदके, पुरस्कार, पीए्च.डी. धारकांची यादी तयार होत आहे.

----------------------------

बडनेरा मार्गावर रेल्वे पुलावर डांबरीकरण

अमरावती : बडनेरा मार्गावर रेल्वे पुलावर डांबरीकरणाची कामे पूर्णत्वास आली आहे. त्यामुळे पुलावर पडलेल्या खड्ड्यांच्या त्रासांपासून वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अगोदर हे खड्डे अपघातासाठी कारणीभूत ठरणारे होते. मात्र, डांबरीकरणामुळे खड्डेदेखील साबूत झाले आहेत.

---------------------

रेल्वे स्थानकावर प्रवांशाची गर्दी वाढली

अमरावती : बडनेरा, अमरावती रेल्वे स्थानकावर गाड्यांची संख्या वाढत असल्यामुळे प्रवाशांची गर्दीदेखील वाढत आहे. कोरोनाकाळात निर्मनुष्य असले्ले रेल्वे स्थानक आता गजबजत आहे. विशेष रेल्वे गाड्यांचे प्रवास भाडे महागले असतानासुद्धा बाहेरगावी ये-जा करण्यासाठी नागरिक रेल्वे प्रवासाला पसंती देत आहेत.

------------------------------

राजकमल चौकात वाहतूककोंडी

अमरावती : येथील राजकमल चौकात रस्ते दुरुस्तीची कामे सुरू असल्यामुळे बडनेरा मार्गावरील वाहतूक नियमित तुंबून जात आहे.? सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे वेगाने करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे. श्याम चौकातही रस्ते निर्मितीची कामे जलद गतीने करावी, अशी मागणी आहे.

Web Title: News / Summary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.