बातमी/ सारांश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:28 IST2021-02-05T05:28:11+5:302021-02-05T05:28:11+5:30
अमरावती : येथील राजापेठ भागात भुयारी गटाराची कामे संथगतीने सुरू आहेत. त्यामुळे उड्डाण पुलावरून वाहतूक सुरू आहे. हा पूल ...

बातमी/ सारांश
अमरावती : येथील राजापेठ भागात भुयारी गटाराची कामे संथगतीने सुरू आहेत. त्यामुळे उड्डाण पुलावरून वाहतूक सुरू आहे. हा पूल अरुंद असल्यामुळे वाहतूक विस्कळीत होत असल्याचे चित्र आहे. राजापीठ उड्डाणपुलाखालील कामे वेगाने करावीत, अशी मागणी वाहनचालक, व्यापाऱ्यांची आहे.
-------------------
बडनेरा मार्गावर डांबरीकरणाला प्रारंभ
अमरावती : बडनेरा मार्गावर सातुर्णा, गोपालनगर भागात डांबरीकरणाची कामे वेगाने सुरू झाली आहेत. या मार्गावर रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले होते. हे खड्डे अपघातास कारणीभूत ठरणारे असताना, वाहनचालकांना हा मोठा दिलासा मानला जात आहे.
-----------------------
माताखिडकी ते भातकुली मार्ग उखडला
अमरावती: स्थानिक माताखिडकी ते भातकुली मार्गावर खड्डे पडल्याने रस्त्यात खडडा की खड्ड्यात रस्ता, असे विदारक चित्र निर्माण झाले आहे. बांधकाम विभागाने या मार्गावरील खड्डे दुरुस्तीसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे. या मार्गावरून ग्रामीण भागात वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. मात्र, खडड्यांमुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत.
-----------------------
वडाळीत वनजमिनीवर वीटभटट्या
अमरावती : स्थानिक आशियाना क्लब ते वडाळी या मार्गावर वनजमिनीवर वीटभटट्यांचे अतिक्रमण वाढले आहे. महसूल विभागाच्या आशीर्वादाने हा सर्व प्रकार सुरू आहे. काही प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याने वनविभाग हतबल झाला आहे. बिच्छुटेकडी भागात वीटभटट्यांचे अतिक्रमण वाढीस लागले आहे.
------------------------
गाडगेनगरात फुटपाथवर व्यवसाय
अमरावती : स्थानिक पंचवटी चौक ते कठोरा नाका या दरम्यान फुटपाथवर अतिक्रमण झाले आहे. किरकाेळ व्यावसायिकांनी फुटपाथवर कब्जा केला आहे. मात्र, महापालिका प्रशासनाकडून थातूरमातूर कारवाई करून पुन्हा ‘जैसे थे’ चित्र हा नित्याचाच भाग झाला आहे. फुटपाथ मोकळे नसल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे.