नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:13 IST2021-02-10T04:13:28+5:302021-02-10T04:13:28+5:30
वीरेंद्र जगताप यांची उपस्थिती : काँग्रेस कमिटीचे आयोजन चांदूर रेल्वे : तालुका व शहर काँग्रेसच्यावतीने येथील एका मंगल कार्यालयात ...

नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार
वीरेंद्र जगताप यांची उपस्थिती : काँग्रेस कमिटीचे आयोजन
चांदूर रेल्वे : तालुका व शहर काँग्रेसच्यावतीने येथील एका मंगल कार्यालयात नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष उत्तरा जगताप, जिल्हा परिषद सदस्य रंजना गवई, माजी अध्यक्ष नितिन गोंडाणे, भानुदास गावंडे, माजी सभापती जगदीश आरेकर, बाजार समितीचे सभापती प्रदीप वाघ, पंचायत समिती सदस्य अमोल होले, प्रभाकर वाघ, बंडू देशमुख, वर्षा देशमुख, नगराध्यक्ष शिट्टू सूर्यवंशी, निवास सूर्यवंशी, अशोक चौधरी आदी उपस्थित होते.