नवयुक्त सदस्यांनी घेतली ग्रामविकासाची शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:36 IST2021-01-08T04:36:38+5:302021-01-08T04:36:38+5:30
निंभोरा बोडका अविरोध, महिलांचा अधिक सहभाग धामणगाव रेल्वे : तालुक्यातील निंभोरा बोडखा येथे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थांनी एकमताने निर्णय ...

नवयुक्त सदस्यांनी घेतली ग्रामविकासाची शपथ
निंभोरा बोडका अविरोध, महिलांचा अधिक सहभाग
धामणगाव रेल्वे : तालुक्यातील निंभोरा बोडखा येथे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थांनी एकमताने निर्णय घेऊन ग्रामपंचायत सदस्यांची अविरोध निवड केली. नवनियुक्त सदस्यांनी ग्रामविकासाची शपथ घेतली आहे.
निंभोरा बोडखा या तीन हजार लोकसंख्येच्या गावात ग्रामपंचायत निवडणूक पहिल्यांदा अविरोध झाली. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीय पटलावर अग्रेसर असलेल्या या गावाने या अविरोध निवडणुकीत महिला सदस्यांना अधिक प्राधान्य दिले. त्यामुळे ग्रामस्थांच्या एकतेच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रभाग १ मधून अरुण गेडाम, प्रवीण बांते, वेणू लांजेवार, तर प्रभाग २ मधून राजू श्रीरामे, सुषमा डुबे, अरुणा दाभाडे तसेच प्रभाग ३ मधून कांचन झेले (चवरे), सचिन बमनोटे, सुलक्षणा बढिये या नवनियुक्त सदस्यांनी आपल्या गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शपथ घेतली आहे. सर्व सदस्य एकत्र येण्यासाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख नीलेश तिवारी यांचा मोठा सहभाग आहे.