नव्या-कोऱ्या स्टार बसेस अमरावतीकरांच्या सेवेत

By Admin | Updated: May 25, 2016 00:33 IST2016-05-25T00:33:33+5:302016-05-25T00:33:33+5:30

पृथ्वीटुर्स अ‍ॅन्ड ट्रॅव्हसच्या २५ स्टार बसेस बुधवारपासून शहर क्षेत्रात धावणार आहेत.

The new Star Yatra will be in Amravati | नव्या-कोऱ्या स्टार बसेस अमरावतीकरांच्या सेवेत

नव्या-कोऱ्या स्टार बसेस अमरावतीकरांच्या सेवेत

१८ मार्ग निश्चित : बसेसमध्ये 'जीपीआरएस' सिस्टिम
अमरावती : पृथ्वीटुर्स अ‍ॅन्ड ट्रॅव्हसच्या २५ स्टार बसेस बुधवारपासून शहर क्षेत्रात धावणार आहेत. मंगळवारी सायंकाळी महापौर रिना नंदा , मनपा आयुक्त हेमंत पवार यांच्या सह सर्व पक्षीय नगरसेवकांनी 'आमची परिवहन' या शहरबससेवेला हिरवी झेंडी दिली.
अंबा मालवाहतूक संघाकडे दिलेली शहरबससेवेची जबाबदारी फेब्रुवारी २०१६ मध्ये संपुष्टात आल्यानंतर नव्याने निविदा मागविण्यात आल्या. निविदे प्रक्रियेनंतर प्रतिकिलोमीटर ५.२२ रुपये दराने रॉयल्टी देणाऱ्या पृथ्वी टुर्स अ‍ॅन्ड ट्रॅव्हल्सच्या निविदेवर शिक्कामोर्तब करण्यात आले. या कंपनीकडून शहरात ४० स्टार बसेस चालविल्या जाणार आहेत. त्यापैकी २५ बसेस मंगळवारीच शहरात दाखल होऊन त्या बसेसची नोंदणी प्रक्रिया करण्यात आली.
अत्याधुनिक स्टार अल्ट्राही शहरबस १८ मार्गावरून धावणार आहे. सकाळी ६ ते रात्री १० वाजाच्या दरम्यान माफक दरात 'आमची परिवहन' प्रवाशांना सेवा देणार आहे, दोन बथ दोन आसन क्षमता असलेली ही बस ३३ सिटर आहे. विशेष म्हणजे या बसमध्ये जीपीआरएस सिस्टिम कार्यान्वित करण्यात आली आहे. प्रवाशामध्ये नेकमे कुठले स्टेशन आहे. याबाबत आगाऊ सूचना मिळेल. अंबा मॉल व प्रवासी वाहतूक संघाच्या नादुरुस्त आणि खटारा झालेल्या बसेसच्या जीवघेण्या प्रवासातून नवीन बसेसमुळे सुटका होणार आहे.'आमची परिवहन'मध्ये कंत्राटदाराने सुमारे २०० कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. यात चालक-वाहकांसह निरिक्षक, यांत्रिकी कर्मचारी यांचा समावेश् आहे. नव्यास्टार बसेससाठी तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी विशेष प्रयत्न केले होते, हे विशेष. (प्रतिनिधी)

Web Title: The new Star Yatra will be in Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.