मुद्रांकात महसुलाची गळती रोखण्यासाठी नवे उपाय

By Admin | Updated: May 22, 2014 23:24 IST2014-05-22T23:24:04+5:302014-05-22T23:24:04+5:30

मुद्रांकाचा गैरवापर व शासनाचे महसूल नुकसान टाळण्यासाठी मुद्रांक विक्री व्यवस्थेवर विभागाचे नियंत्रण असावे, यासाठी राज्यातील सर्व परवानाधारक मुद्रांक विक्रेत्यांनी मुद्रांकांची विक्री करताना

New remedies for stopping revenue from the stamp | मुद्रांकात महसुलाची गळती रोखण्यासाठी नवे उपाय

मुद्रांकात महसुलाची गळती रोखण्यासाठी नवे उपाय

आता राहणार दोन शिक्के : पाच हजारांवरील मुद्रांकासाठी ‘ऐआर’ला एसएमएस

गजानन मोहोड - अमरावती

मुद्रांकाचा गैरवापर व शासनाचे महसूल नुकसान टाळण्यासाठी मुद्रांक विक्री व्यवस्थेवर विभागाचे नियंत्रण असावे, यासाठी राज्यातील सर्व परवानाधारक मुद्रांक विक्रेत्यांनी मुद्रांकांची विक्री करताना मुद्रांकाच्या मागील बाजूस दोन प्रकारचे शिक्के उमटवावे लागत आहेत. तसेच दस्तासाठी वापरण्यात येणारा मुद्रांक ५ हजारांचे वर असल्यास व मुद्रांक नोंदणी होत असल्यास संबंधित दुय्यम निबंधकांना संक्षिप्त मजकुरासह एसएमएसद्वारे कळवावे लागत आहे. मुद्रांक विक्रीमध्ये एकसूत्रता आणण्यासाठी शासनाने उपाययोजना केली आहे. त्याअन्वये विक्री केलेला मुद्रांक ज्या कारणासाठी खरेदी केला जात असेल त्याच कारणासाठी उपयोगात आणणे आवश्यक आहे. १०० रुपयांचा मुद्रांक खरेदी करुन त्याचा गैरवापर प्रतिज्ञापत्र व्यतिरिक्त इतर दस्तऐवजांसाठी करुन मुद्रांक शुल्क चुकविण्याचे अनेक प्रकार निदर्शनास आले आहेत. त्यामुळे मुद्रांकाची विक्री प्रतिज्ञापत्राकरिता करायची असल्यास त्यावर प्रतिज्ञापत्राचे कारण, मुद्रांक विकत घेणार्‍याचे नाव व रहिवासी पत्ता, मुद्रांक विक्रीबाबतच्या नोंदवहीवरील अनुक्रमांक व दिनांक, मुद्रांक विकत घेणार्‍याची सही व परवानाधारक मुद्रांक विक्रेत्यांची सही, परवाना क्रमांक, मुद्रांक विक्रीचे ठिकाण व पत्त्याची माहिती असणारा शिक्का उमटवावा लागणार आहे. प्रतिज्ञापत्राशिवाय इतर प्रयोजनासाठी मुद्रांक विक्री केल्यास परवानाधारक मुद्रांक विक्रेत्याने दस्ताचा प्रकार, दस्तऐवज नोंदणी करणार आहे काय? नोंदणी होणार असल्यास संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयाचे नाव, मिळकतीचे वर्णन, मोबदला रक्कम, मुद्रांक विकत घेणार्‍याचे नाव, दुसर्‍या पक्षकाराचे नाव, हस्ते असल्यास त्याचे नाव व पत्ता, मुद्रांक शुल्क रक्कम, मुद्रांक विक्री वहीवरील अनुक्रमांक, मुद्रांक विकत घेणार्‍याची सही व परवानाधारक मुद्रांक विक्रेत्याची सही आणि परवाना क्रमांक तसेच मुद्रांक विक्रीचे ठिकाण व पत्ता अंकित असलेला ठसा उमटवावा लागत आहे. ज्या कारणासाठी ज्यांनी मुद्रांक खरेदी केला त्यांनी त्याच कारणासाठी मुद्रांक खरेदी केल्यापासून ६ महिन्यात वापरणे बंधनकारक आहे. ५ हजारांपेक्षा वर मुद्रांकासाठी 'एआर'ला एसएमएस दस्तऐवजासाठी वापरण्यात आलेला मुद्रांक जर ५०००, १०,०००, २५,००० रुपयांचा असेल तर अशा मुद्रांकाचा विक्री नोंदवही क्रमांक, पक्षकाराचे तसेच मुद्रांकधारण करणार्‍याचे नाव, रक्कम असलेला संक्षिप्त मजकूर एसएमएसद्वारे संबंधित दुय्यम निबंधकाला (एआर) कळवावा लागेल. मुद्रांकाची अल्ट्रा व्हायोलेट दिव्याखाली तपासणी परवानाधारक मुद्रांक विक्रेत्यांनी त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक, दुय्यम निबंधक कार्यालयात द्यावा लागणार आहे, ज्या मुद्रांक विक्रेत्यांनी मुद्रांकाची विक्री केली. त्याने ज्या कार्यालयास दस्त नोंदणी होणार आहे. त्या कार्यालयास एसएमएस पाठवावा लागणार आहे. जर दुय्यम निबंधकांना एसएमएस प्राप्त नाही तर त्यांनी स्वत: मुद्रांक विक्रेत्याला फोन करुन सदर मुद्रांक त्याच विक्रेत्याने विकल्याची खातरजमा करावी लागणार आहे. अधिक खात्रीकरिता अशा मुद्रांकाची अल्ट्रा व्हायोलेट दिव्याखाली तपासणी करावी व तसा शेरा दस्तावर नमूद करुन त्यावर स्वाक्षरी करावी लागणार आहे.

Web Title: New remedies for stopping revenue from the stamp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.