न्यू प्रभात कॉलनीत आढळला बिबट!
By Admin | Updated: September 14, 2015 00:07 IST2015-09-14T00:07:19+5:302015-09-14T00:07:19+5:30
शहरातील मध्य वस्तीत असणाऱ्या न्यू प्रभात कॉलनीत सायंकाळी ४.४५ वाजता बिबट आढळल्याची माहिती एका ७० वर्षीय वृध्दाने वनविभागाला दिली.

न्यू प्रभात कॉलनीत आढळला बिबट!
अमरावती: शहरातील मध्य वस्तीत असणाऱ्या न्यू प्रभात कॉलनीत सायंकाळी ४.४५ वाजता बिबट आढळल्याची माहिती एका ७० वर्षीय वृध्दाने वनविभागाला दिली. शिकारी प्रतिबंधक पथकाने सर्व परिसरात पिंजून काढल्यावर बिबट दिसल्याचे कुठलेही पुरावे वनकर्मचाऱ्यांच्या हाती लागले नाही. मात्र, बिबटच्या आढळल्याच्या अफवेमुळे शिकारी प्रतिबंधक पथकाची चांगलीच दमछाक झाली होती.
न्यू प्रभात कॉलनीतील रहिवासी लाहोरे यांनी बिबट आढळल्याची माहिती राजापेठ पोलिसांना दिली. पोलिसांनी माहिती वनविभागाला दिल्यावर काही वेळातच शिकारी प्रतिबंधक पथकांतील पी.टी. वानखडे, अमोल गावनेर, रविंद्र कुंडलकर, फिरोज खान सतीश उमक, मनोज ठाकूर, चंदू ढवळे, विरेंद्र उज्जैनकर व वाहनचालक तनपुरे यांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी लाहोरे यांच्या माहितीवरून बिबटची शोधाशोध सुरु केली. बिबटच्या पायाचे ठसे पाहण्याचे प्रयत्न सुरु केले, मात्र, बिबटच्या पायाचे ठसे आढळून आले नाही. त्यामुळे वनकर्मचाऱ्यांनी न्यू प्रभात कॉलनी परिसरातील नागरिकांची चौकशी करुन आजुबाजूचा सर्व परिसरात पिंजून काढला. तब्बल तासभर वनकर्मचाऱ्यांनी बिबटचा शोध घेतला, मात्र बिबट दिसल्याची शहानिशा झाली नाही. मात्र, या अफवेमुळे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना चांगलेच परिश्रम घ्यावे लागले. या अफवेमुळे शहरात दहशत निर्माण झाली होती. सायंकाळपर्यंत बिबटचा शोधशोध सुरु होती, मात्र, त्यानंतर अंधार पडल्यामुळे बिबटचा शोध घेता आला नाही. आता सोमवारी वनकर्मचारी बिबटचा शोध घेणार आहे.