चिखलदऱ्यात नवे पोलीस विश्रामगृह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:10 IST2021-06-28T04:10:27+5:302021-06-28T04:10:27+5:30

फोटो पी २७ चिखलदरा चिखलदरा : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अहोरात्र कार्यरत असतात. कोरोना साथीच्या काळात ...

New police rest house in Chikhaldara | चिखलदऱ्यात नवे पोलीस विश्रामगृह

चिखलदऱ्यात नवे पोलीस विश्रामगृह

फोटो पी २७ चिखलदरा

चिखलदरा : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अहोरात्र कार्यरत असतात. कोरोना साथीच्या काळात जोखीम पत्करून त्यांनी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या व आताही पार पाडत आहेत. त्यामुळे पोलीस दलाचे अधिक बळकटीकरण करण्याबरोबरच नानाविध दर्जेदार सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केले.

जिल्हा ग्रामीण पोलीस दलातर्फे चिखलदरा येथील हरिकेन पॉइंट येथे उभारण्यात आलेल्या पोलीस विश्रामगृहाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती दयाराम काळे, चिखलदरा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा विजया सोमवंशी, पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन., श्वेता के. हरी बालाजी, अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे, पोलीस उपअधीक्षक प्रदीप सूर्यवंशी, तहसीलदार श्रीमती माने, पोलीस निरीक्षक सदानंद मानकर चिखलदऱ्याचे ठाणेदार राहुल वाढवे आदी यावेळी उपस्थित होते.

===Photopath===

270621\img-20210627-wa0055.jpg

===Caption===

पोलीस विश्रामगृहाची उद्घाटन

Web Title: New police rest house in Chikhaldara