नव्या गण, गटांची वाट बिकट
By Admin | Updated: October 7, 2016 00:19 IST2016-10-07T00:19:58+5:302016-10-07T00:19:58+5:30
जिल्हा परिषद गटांची आरक्षण सोडत ५ आॅक्टोबरला जाहीर झाली. यात काही गट नव्याने अस्तित्वात आले तर काही गण, गटांच्या नावात बदल करण्यात आला.

नव्या गण, गटांची वाट बिकट
जि.प. आरक्षण सोडत : पाच गटांच्या नावात बदल, दोन नव्याने अस्तित्वात
जितेंद्र दखने अमरावती
जिल्हा परिषद गटांची आरक्षण सोडत ५ आॅक्टोबरला जाहीर झाली. यात काही गट नव्याने अस्तित्वात आले तर काही गण, गटांच्या नावात बदल करण्यात आला. यात जि.प.चे दोन गट तर पंचायत समितीचे चार गण नव्याने अस्तित्वात आले आहेत.
फेररचनेत चिखलदरा तालुक्यातील सलोना आणि अमरावती तालुक्यातील पुसदा नांदगाव खंडेश्वर, भातकुली , अंजनगाव सुर्जी तालुक्यातील काही गण व गटांची नावे बदलली आहेत. आरक्षणात बदलात विद्यमान पदाधिकारी, सदस्यांना यांचा सर्वाधिक फटका बसला. याच दिवशी ९८ गणांचे आरक्षण काढण्यात आले. यात मोठे फेरबदल झाले
फेररचनेमुळे बदल
अमरावती : तथा आरक्षणात अनुसूचित जातीसाठी एकूण ११ आहेत. अनुसूचित जमातीसाठी एकूण १२ जागा, नामाप्र १६ जागा आहेत. सर्वसाधारणसाठी २० जागा आहेत. या आरक्षणात आवश्यक त्या ठिकाणीच चिठ्ठी काढण्यात आली. दरम्यान २०१७ च्या निवडणुकीला जिल्ह्यात अस्तित्वात आलेल्या नगरपंचायतींचा फटका बसला. धारणी, तिवसा, भातकुली, नांदगाव येथे नगरपंचायत अस्तित्वात आल्यात. येथील जिल्हा परिषद सर्कलचे नाव बदलले आहेत. तर अंजनगाव सुर्जी आणि भातकुुली येथील प्रत्येकी एक जिल्हा परिषदेचा गट कमी झाल्याने या दोन तालुक्यांतील सर्कलचे नावे बदलले आहेत. चिखलदरा आणि अमरावती तालुक्यात प्रत्येकी एक सर्कल वाढल्याने दोन नवे सर्कल अस्तित्वात आले आहेत. त्यामुळे काही नवे तर काही सर्कलचे नाव बदलण्यात आले आहेत. त्यामुळे राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
फेररचनेत नव्या गणांची निर्मिती
नव्याने चार नगरपंचायती स्थापित झाल्याने हे क्षेत्र नागरी झाले .त्यामुळे गट, गणांची फेररचना होऊन सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या गावांची नावे गण, गटांना देण्यात आलीत. यामुळे काही पंचायत समितीच्या गणाचे नाव बदलले आहेत. यामध्ये धारणी तालुक्यातील हरीसाल व कुटंगा, भातकुली तालुक्यात आसरा व निंभा, नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यात धानोरा गुरव व मंगरूळ चव्हाळा अशी गणांची नावे आहेत. फेररचनेत अंजनगाव सुर्जी तालुक्यातील भंडारज आणि निमखेड बाजार हे गण नव्याने अस्तित्वात आले आहेत. तर चिखलदरा तालुक्यात सलोना व काटकुंभ व अमरावती तालुक्यात पुसदा व कठोरा बु. हे नवे गण अस्तित्वात आले आहेत.त्यामुळे ईच्छूक उमेदवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे.