नवे संकट, बुरशीजन्य रोगाने संत्राची गळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 05:01 IST2020-08-25T05:00:00+5:302020-08-25T05:01:11+5:30

संत्रावर फळे येण्याची प्रक्रिया, फळधारणा व झाडावर फळे टिकविण्याची, राहण्याची धारणा व क्षमता ही वेगवेगळ्या नैसर्गीक बाबींवर अवलंबून आहे. संत्रा झाडाला १० हजारांपासून दोन लाखांपर्यत कळ्या व फूल लागतात. यापैकी फुल व लहान फुल गळूण पडतात. झाडाच्या पोषणाचे क्षमतेनुसार १ ते ३.५ टक्के फळ शेवटपर्यत टिकतात. संत्रा पिकाचा आंबिया बहर नैसर्गीक असल्याने अनेक शेतकऱ्यांचा कल याकडे असतो.

New crisis, orange throat with fungal disease | नवे संकट, बुरशीजन्य रोगाने संत्राची गळ

नवे संकट, बुरशीजन्य रोगाने संत्राची गळ

ठळक मुद्देकरोडोंचे नुकसान : कोलेटोट्रीकम, डिप्लोडिया, फायटोप्थोरा अन् आॅलटरनेरीया कारणीभूत

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात उत्पादनक्षम संत्राचे ५८ हजार ३५० हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी बहुतेक भागात आंबियाची फळगळ होत असल्याने संत्रा उत्पादकांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. यामध्ये बुरशीजन्य आजारांनी सर्वाधिक फळगळ होत आहे. याला अपुरे पोषण, कीड व रोगही कारणीभूत असल्याचे कृषी विद्यापीठाचे अ. भा. समन्वित संशोधन प्रकल्पाचे शास्त्रज्ञांचे निरीक्षण आहे. यासाठी एकात्मिक व्यवस्थापन महत्वाचे आहे.
संत्रावर फळे येण्याची प्रक्रिया, फळधारणा व झाडावर फळे टिकविण्याची, राहण्याची धारणा व क्षमता ही वेगवेगळ्या नैसर्गीक बाबींवर अवलंबून आहे. संत्रा झाडाला १० हजारांपासून दोन लाखांपर्यत कळ्या व फूल लागतात. यापैकी फुल व लहान फुल गळूण पडतात. झाडाच्या पोषणाचे क्षमतेनुसार १ ते ३.५ टक्के फळ शेवटपर्यत टिकतात. संत्रा पिकाचा आंबिया बहर नैसर्गीक असल्याने अनेक शेतकऱ्यांचा कल याकडे असतो. मात्र, आंबियाच्या फळांची विषम परिस्थितीत वाढ होत असते. थंडीच्या काळात फुलांचे फळात रुपांतर होणे, वाढीच्या काळात कडक उन्हाळा व नंतर पावसाळा अशा विपरीत फळे वाढतात. तशी काही कारणांनी फळगळ देखील होत. सध्या बुरशीजन्य रोग व अपुºया पोषणामुळे आंबियाची गळ होत असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगीतले.
ही उपाययोजना महत्वाची
खाली पडलेली पाने व फळे यांची विल्हेवाट लावावी, वाफा स्वच्छ ठेवावा. बागेतले पाणी उताराचे दिशेने काढावे. अन्यथा ‘फायटोफ्थोरा’ बुरशीची लागण अधिक होते. ‘ब्राऊन रॉटसाठी’ संपूर्ण झाडावर फोसिटिल एएल २.५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिीक्लोराईड ५० डब्लूपी २.५ ग्रॅम किंवा कॅप्टन ७५ डब्लूपी २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी घेवून फवारणी करावी. ‘कोलेटोट्रिकम स्टेम एंड रॉट’मुळे होणाºया फळगळसाठी बोर्डेक्स ०.६ टक्के मिश्रण किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड ५० डब्ल्यूपी २.५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझीम ५० डब्लूपी १ ग्रॅम प्रतीलिटर पाणी घेवूण फवारणी करावी. फळावरील कूज असल्यास बेंझिमिडाझोल या वर्गातील बुरशीनाशकांची फवारणी करावी.

बुरशीजन्य फळगळ
संत्रामध्ये कोलेटोट्रीकम, डिप्लोडिया, फायटोप्थोरा व ऑलटरनेरीया या बुरशीमुळे फळगळ होत आहे. जमिनीलगतच्या हिरव्या फळांवर तपकीरी करड्या डागांची सुरवात होवून फळ गळूण पडतात. या फळसडीला ‘ब्राऊन रॉट किंवा तपकीरी रॉट’ म्हणतात. कमी तापमान, अपुरा सुर्यप्रकाश व पावसाची झड यामुळे हा रोग अधिक प्रमाणात पसरतो. ‘डिप्टोडिआ’मुळे फळाच्या देठाजवळ हलक्या पिवळ्या रंगाचा चट्टा पडतो. यावर दाब दिल्यास मऊ जाणवतो. कोलेटोट्रिकम बुरशीमुळे फळाच्या देठाजवळ काळी रिंग तयार होवूण ती वाढत जाते व फळ सडते आदीमुळे फळगळ होत असल्याचे विद्यापीठाचे शास्त्रज्ञ योगेश इंगळे व दिनेश पैठनकर यांनी सांगीतले.

Web Title: New crisis, orange throat with fungal disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती