शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वादग्रस्त डीएफओच्या चौकशीसाठी पुन्हा नवी समिती, मुख्य वनसंरक्षकांचा निर्णय

By गणेश वासनिक | Updated: February 23, 2024 21:52 IST

आता आठ सदस्यांचा समावेश, जुनी गठित चौकशी समिती गुंडाळली, वनमंत्र्यांनी घेतली दखल

गणेश वासनिक, अमरावती: वन विभागाच्या अमरावती प्रादेशिकचे वादग्रस्त उपवनसंरक्षक अमितकुमार मिश्रा यांच्यावर एका महिला आरएफओंनी गंभीर आरोप केल्यानंतर मिश्रा यांच्या चौकशीसाठी मुख्य वनसंरक्षक जयोती बॅनर्जी यांनी पाच सदस्यीय समिती गठित केली होती. या समितीचे कामकाज शून्य असल्याचे लक्षात येताच आता पुन्हा आठ सदस्यीय समितीचे गठन करण्यात आले आहे. या समितीत स्वत: सीसीएफ बॅनर्जी आहेत.

महिला आरएफओ यांनी १० फेब्रुवारी २०२४ रोजी प्रधान मुख्य वनसंरक्षक शैलेश टेंभुर्णीकर यांच्याकडे पाठविलेल्या तक्रारीत डीएफओ अमितकुमार मिश्रा यांच्या कारनाम्याची यादीच सादर केली. एवढेच नव्हे तर आरएफओ संघटनेच्या शिष्टमंडळाने सीसीएफ जयोती बॅनर्जी यांची भेट घेत निवेदनाद्वारे डीएफओ मिश्रा यांच्याविषयी चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार सीसीएफ बॅनर्जी यांनी १४ फेब्रुवारी रोजी पाच सदस्यीय समिती नेमली. मात्र या समितीने डीएफओ मिश्रा यांची चौकशी करण्यास नकार दिल्याची माहिती आहे. कारण डीएफओंची चौकशी डीएफओ हाच मुळात प्रश्न उद्भवला होता. मात्र हे प्रकरण अंगलट येण्याचे दिसून येताच सीसीएफ बॅनर्जी यांनी २१ फेब्रुवारी २०२४ रोजी आठ सदस्यीय असलेली नव्याने चौकशी समिती गठित केली आहे. या समितीत स्वत: बॅनर्जी असल्यामुळे तक्रारकर्त्या महिला आरएफओंना न्याय मिळण्याची शक्यता आहे.अशी आहे नवीन आठ सदस्यीय चौकशी समिती

डीएफओ मिश्रा यांच्यावर असलेल्या आरोपाच्या चौकशीसाठी नवीन आठ सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्ष सीसीएफ जयोती बॅनर्जी या आहेत. तर सदस्य म्हणून गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक सुमंत साेळंके, अकोला प्रादेशिकचे उपवनसंरक्षक कुमारस्वामी एस.आर., चिखलदरा वन प्रशिक्षण संस्थेच्या संचालक मुक्ता टेकाडे, विभागीय वन अधिकारी (दक्षता) किरण पाटील, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे आरएफओ योगेस तापस, मेळघाट वन्यजीव आरएफओ प्रीती आसोलकर, निर्देशन विभागाचे प्रशासकीय अधिकारी पी. आर. गुंडलवार यांचा समावेश आहे.

टॅग्स :forestजंगलforest departmentवनविभाग