‘इर्विन’मध्ये येणार नवे सिटी स्कॅन मशीन

By Admin | Updated: March 23, 2016 00:20 IST2016-03-23T00:20:59+5:302016-03-23T00:20:59+5:30

जिल्हा सामान्य रूग्णालयात नवे सिटी स्कॅन मशीन येणार आहे. या यंत्रासाठी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या पुढाकाराने...

New City Scan Machine will come in 'Irwin' | ‘इर्विन’मध्ये येणार नवे सिटी स्कॅन मशीन

‘इर्विन’मध्ये येणार नवे सिटी स्कॅन मशीन

अमरावती : जिल्हा सामान्य रूग्णालयात नवे सिटी स्कॅन मशीन येणार आहे. या यंत्रासाठी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या पुढाकाराने जिल्हा वार्षिक योजनेतून २ कोटी ४१ लाख रूपये मंजूर केले आहेत. हे नवीन सिटी स्कॅन मशीन लवकरच रुग्णांच्या सेवेत दाखल होणार आहे.
जिल्हा सामान्य रूग्णालयात नवीन सिटी स्कॅन मशीन देण्यात यावे, यासाठी नागरिकांसह रूग्णांनी पालकमंत्र्यांकडे निवेदन दिले होते. जिल्हा सामान्य रुग्णालयातील जुने सिटी स्कॅन मशीन निर्लेखित करण्यात आले असून नवीन मशीन चेन्नई येथून खरेदी केले जाणार आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक अरुण राऊत यांनी पालकमंत्री प्रवीण पोटे यांचे आभार मानले आहेत. नव्या सिटी स्कॅन मशिनमुळे येथे जिल्ह्याभरातून येणाऱ्या रूग्णांची ससेहोलपट थांबणार असून तातडीने उपचार मिळण्याची सोेयदेखील होणार आहे. यामुळे रुग्णांची इतरत्र धावपळीचा त्रास कमी होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: New City Scan Machine will come in 'Irwin'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.