१३ किलोमीटरच्या रस्त्यावर निव्वळ खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:14 IST2021-01-03T04:14:42+5:302021-01-03T04:14:42+5:30
गुरुकुंज मोझरी : तिवसा तालुक्यातील शेंदोळा धस्कट ते मार्डी या अमरावती शहराला जोडणाऱ्या १३ किलोमीटर रस्त्यावर जीवघेण्या खड्डयांची ...

१३ किलोमीटरच्या रस्त्यावर निव्वळ खड्डे
गुरुकुंज मोझरी : तिवसा तालुक्यातील शेंदोळा धस्कट ते मार्डी या अमरावती शहराला जोडणाऱ्या १३ किलोमीटर रस्त्यावर जीवघेण्या खड्डयांची आरास निर्माण झाली आहे. चहुकडे खड्डेच खड्डे दिसून येतात. त्यामुळे रस्ता नावापुरताच उरला आहे. या मार्गावरून दररोज हजारो प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
या रस्त्यावरून मोर्शीमार्गे डवरगाव -एमआयडीसीतून शेंदोळा बु. मार्डीमार्गे अमरावती, अशी गौणखनिजाची अवैध व ओव्हरलोड वाहतूक होत होती. त्यामुळे सर्वसामान्यांच्या वाहतुकीच्या सोयीसाठी निर्मित रस्त्याची अवाजवी वजनाच्या वाहतुकीमुळे धूळधाण झाली आहे. यामार्गाने अवैध वाहतूक करण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यात प्रामुख्याने जड वाहनांना लागणारा टोल टॅक्स भरावा लागत नाही. सोबतच माहुली जहागीर, नांदगाव पेठ पोलीस ठाणे टाळता येते. या रस्त्याने फारशी वर्दळ नसल्यामुळे कमी वेळात अमरावती शहरात प्रवेश करता येत असल्यामुळे रात्रंदिवस या रस्त्याचा जड वाहतुकीसाठी नित्यनियमाने उपयोग होतो. परिणामी शहराला जोडलेल्या महत्त्वपूर्ण रस्त्याची पूर्णत: वाट लागली आहे.
---------------------