मामाच्या त्रासाला कंटाळून भाच्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:12 IST2020-12-25T04:12:36+5:302020-12-25T04:12:36+5:30

फोटो पी २४ म्हैसपूर फोल्डर वाठोडा शुक्लेश्वर : मामा, मामी व मामेभावाच्या त्रासाला कंटाळून २० वर्षीय तरुणाने गळफास ...

Nephew commits suicide due to uncle's troubles | मामाच्या त्रासाला कंटाळून भाच्याची आत्महत्या

मामाच्या त्रासाला कंटाळून भाच्याची आत्महत्या

फोटो पी २४ म्हैसपूर फोल्डर

वाठोडा शुक्लेश्वर : मामा, मामी व मामेभावाच्या त्रासाला कंटाळून २० वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. खोलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील म्हैसपूर येथे २३ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास ही घटना उघड झाली. मंगेश ऊर्फ प्रतीक शंकर शेरोकार (२०, रा. म्हैसपूर) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी खोलापूर पोलिसांनी मंगेशने मृत्यूपूर्व लिहिलेली चिठ्ठी जप्त केली. त्यानुसार, त्याचे दोन मामा, दोन मामी तथा दोन मामेभाऊ, मामेबहीण अशा एकूण सात जणांविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. सर्वांना ताब्यात घेण्यात आले.

मंगेश आपल्या कुटुंबासह मामाच्या गावी राहत होता. दोन मामा व त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांनी सोयाबीनचे पैसे आम्हाला दे, अन्यथा तुला जीवाने मारतो, अशी धमकी दिली. त्यांनी आईलादेखील मारण्याची धमकी दिली. त्यांनी आपल्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, अशी चिठ्ठी लिहून मंगेशने घरातच आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच खोलापूर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. याप्रकरणी मधुकर ओंकार भोंडे, राहुल मधुकर भोंडे, गोविंदा शंकरराव भोंडे, ऐश्वर्य गोविंद भोंडे, यांच्यासह एक अल्पवयीन मुलगी दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले. ठाणेदार किशोर जुनघरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनंता वायधने, विशाल कैलकर, गजानन ठाकूर हे तपास करत आहेत.

------

Web Title: Nephew commits suicide due to uncle's troubles