तळेगाव येथील प्रभाग १ मध्ये ग्रामपंचायतचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:13 IST2021-04-02T04:13:08+5:302021-04-02T04:13:08+5:30
तळेगाव दशासर : स्थानिक प्रभाग १ मधील समस्या निवारणाबाबत ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. गावातील पाचही वाॅर्डांमध्ये नाल्या ...

तळेगाव येथील प्रभाग १ मध्ये ग्रामपंचायतचे दुर्लक्ष
तळेगाव दशासर : स्थानिक प्रभाग १ मधील समस्या निवारणाबाबत ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. गावातील पाचही वाॅर्डांमध्ये नाल्या सफाईचे काम पूर्ण झालेले नाही. सदर पशुवैद्यकीय दवाखान्याजवळील नाली पूर्णपणे कचऱ्याने तुडुंब भरल्याने नालीतील घाण पाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आठवडी बाजार येथे गुरांना पाणी पिण्याची व्यवस्था आहे. परंतु, नव्याने बांधण्यात आलेल्या नाल्यामुळे गुरांना पाणी पिण्यास अडथळा येत आहे. काही जनावरे पाणी पिण्याच्या नादात या नाल्यामध्ये पडून जखमी झाले आहेत. प्रभाग १ साठी एकूण तीन सदस्यांची निवड करण्यात आली आहे. परंतु, येथील समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप येथील नागरिक करीत आहेत.