नीलम पेठेने केली न्यायाधीशाची परीक्षा उत्तीर्ण
By Admin | Updated: March 13, 2016 00:10 IST2016-03-13T00:10:44+5:302016-03-13T00:10:44+5:30
जिद्य, चिकाटीने आपण जग जिंकू शकतो, हे सांगणारी नीलम जयकिशोर पेठे या सामान्य कुटुंबातल्या विद्यार्थिनीने प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी व दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर ...

नीलम पेठेने केली न्यायाधीशाची परीक्षा उत्तीर्ण
अमरावती : जिद्य, चिकाटीने आपण जग जिंकू शकतो, हे सांगणारी नीलम जयकिशोर पेठे या सामान्य कुटुंबातल्या विद्यार्थिनीने प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी व दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर ही परीक्षा उत्तीर्ण करून यशाचे शिखर गाठले. त्या येथील डॉ.पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या २०१३ च्या एलएलएमच्या विद्यार्थिनी असून त्यांचा शनिवारी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी सत्कार केला.
जून २०१५ मध्ये प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी या पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्राथमिक परीक्षा पार पडली होती. तर १० मार्च रोजी लागलेल्या निकालात तिचे नाव यादीत झळकले होते. यावेळी महाविद्यालयात प्राचार्य प्रणय मालविय यांच्या मार्गदर्शनाखाली विधीज्ञ प्रकाश दाभाडे, राजेश पाटील, दिनेश नागवाणी, मनीष वाडीवे, संजय घोगे आदींनी पुष्पगुष्छ देवून निलम पेठे हिचा गौरव केला.
नीलम पेठे प्रथमश्रेणी न्यायाधीशपदाच्या परीक्षेत १२९ व्या क्रमांकावर गुणवत्तायादीत स्थान प्राप्त केले आहे. (प्रतिनिधी)