‘राष्ट्रसंताचे विचार काळाची गरज’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2016 00:02 IST2016-07-21T00:02:08+5:302016-07-21T00:02:08+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सामुदायिक प्रार्थनेची संकल्पना प्रथम मांडली. ती आजही कमालीची प्रभावी आहे.

‘राष्ट्रसंताचे विचार काळाची गरज’
मोझरीत गुरुपौर्णिमा महोत्सव : समाधीस्थळाची आकर्षक सजावट
अमरावती : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सामुदायिक प्रार्थनेची संकल्पना प्रथम मांडली. ती आजही कमालीची प्रभावी आहे. राष्ट्रसंताचे विचार आत्मसात करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकारणी सदस्य निळंकठ हळदे यांनी केले. ते गुरुकुंज मोझरी येथील आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवाप्रसंगी बोलत होते.
अखिल भारतीय सेवा मंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश वाघ, सरचिटणीस जनार्दनपंत बोथे, गुलाब खवसे, वाडेकर आदी भक्त यावेळी उपस्थित होते. हजारो गुरुदेव भक्तांची समाधीस्थळी दर्शनासाठी रीघ लागली होती.
राष्ट्रसंतांच्या महासमाधीस्थळी गुरुपौर्णिमा महोत्सवाचे औचित्य साधून पहाटे ४ वाजता महासमाधी अभिषेक व पूजन करण्यात आले. आचार्य हरिभाऊ वेरुळकर, शंकरराव इंगळे, सुरेश डोंगरे यांनीही विचार व्यक्त केले. भजनसंध्या कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता झाली.