समाजाच्या प्रगतीसाठी एकत्र येणे काळाची गरज
By Admin | Updated: December 26, 2016 00:36 IST2016-12-26T00:36:42+5:302016-12-26T00:36:42+5:30
समाजाच्या प्रगतीसाठी विखुरलेल्या घटकांना एकाछताखाली आणून समाजाचे हित जोपासण्यासाठी

समाजाच्या प्रगतीसाठी एकत्र येणे काळाची गरज
रवींद्र मुंदे : घाटोळे, कुणबी समाजाचा मेळावा
अमरावती : समाजाच्या प्रगतीसाठी विखुरलेल्या घटकांना एकाछताखाली आणून समाजाचे हित जोपासण्यासाठी एकत्र येणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य तथा घाटोळे कुणबी पाटील समाज संघटनेचे जिल्हाअध्यक्ष रवींद्र मुंदे यांनी केले. ते रविवार रोजी आयोजित घाटोळे समाजाच्या उपवर युवक-युवती परिचय मेळाव्यात प्रास्तावीत कार्यक्रमाला संबोधित करताना बोलत होते.
यावेळी व्यासपिठकावर माजी आमदार ज्ञानेश्र्वर धाने पाटील , माजी उपमहापौर चेतन पवार, साहेबराव काठोळे, गणेश तनपुरे, अनिल पाटील, सुधाकर मुरादे, बारड साहेब, सुभाष लळे, गुलाबराव बोरकर,रेवतीनाथ रंगाचार्य, महादेव अळसपुरे आदीची उपस्थिती होती.
रविवारी दुपारी १२ वाजता साईनगर ते अकोली मार्गावरील एका मंगल कार्यालयात मेळाव्या निमित्ताने समाज एकत्र आले होते.पुढे बोलतांना मुंदे म्हणाले घाटोळे समाजाची संख्या अमरावतीच नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्यात मोठया संख्येने आहे. परंतु आता पर्यत समाज पाहीजे तशा प्रमाणात एकत्र येत नव्हता त्यामुळे विखुरलेल्या समाज बांधवाना एकत्र आणून त्याची समाज बांधवाशी आदन पदान करण्यासाठी मागील काही वर्षापासून घाटोळे कुणबी पाटील समाजाचा युवक-युवती मेळावा आयोजित करण्यात येत आहे. दिवसेंदिवस या मेळाव्याची व्याप्ती वाढत आहे. ही सर्व फलश्रुती समाज बांधवाच्या सहकाऱ्याचे फलित असल्याचे मुंदे म्हणालेत. यावेळी विविध भागातून आलेल्या सुमारे दोनशे युवक -युवतींनी परिचय मेळाव्यात सहभाग घेतला. यावेळी उपस्थित मान्यवरांनीसुद्धा मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन ओम मुंदे, अनिल लळे, खुशाल अळसपुरे यांनी, तर आभार प्रदर्शन प्रवीण डांगे, संजय शेटे यांनी केले. मेळाव्याला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. (प्रतिनिधी)