सोयाबीन लागवड तंत्रज्ञान गरजेचे

By Admin | Updated: July 1, 2016 00:16 IST2016-07-01T00:16:04+5:302016-07-01T00:16:04+5:30

जिल्ह्यात खरीप पेरणीची लागवड वाढत आहे. परंतु बाजारातील असो की घरचे बियाणे पेरणी करण्यापूर्वी काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

Need soybean planting technology | सोयाबीन लागवड तंत्रज्ञान गरजेचे

सोयाबीन लागवड तंत्रज्ञान गरजेचे

कृषी तज्ज्ञांचा सल्ला : बियाण्यांची काळजी हवी, पट्टापेर पद्धती योग्य
अमरावती : जिल्ह्यात खरीप पेरणीची लागवड वाढत आहे. परंतु बाजारातील असो की घरचे बियाणे पेरणी करण्यापूर्वी काळजी घेणे महत्त्वाचे आहे. अपेक्षित उत्पन्न तेव्हाच मिळू शकते. बियाणे अधिक खोल पडणे, पाणी साचलेल्या जमिनीत पेरणी, पेरणीनंतर पावसाचा खंड योग्य निचरा न होणारी जमीन आदी कारणांमुळे बियाण्यांची उगवण शक्ती कमी होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
जिल्ह्यात सोयाबीन हे खरिपाचे प्रमुख पीक आहे व खरीपाच्या एकूण क्षेत्राच्या ५० टक्के पेरणी क्षेत्र आहे. सोयाबीनची मध्यम ते भारी व पाण्याचा चांगला निचरा होणारी व जमिनीच सामू ६.५ ते ७.५ असलेल्या जमिनीची निवड करावी. हलक्या, उथळ व क्षारयुक्त जमिनीवर सोयाबीनची पेरणी करू नये. सलग १० वर्षापासून सतत एकाच क्षेत्रात व एकाच वाणाचा उपयोग केल्यामुळे कीड व रोगांचा प्रकोप वाढतो व त्यासाठी सोयाबीन पिकाची कमी होत जाणारी प्रतिकारशक्ती कारणीभूत ठरते.
सर्वसाधारणपणे सोयाबीन,मूग,उडीद या पिकांची बैलजोडीने पेरणी करायची झाल्यास तिनदाती तिफन अथवा काकटीने पेरणी करायची झाल्यास प्रत्येक वेळी परंतु येताना चौैथी ओळ रिकामी ठेवावी व या ओळीत डवराच्या फेटाच्या वेळी, डवरणी आटोपल्यानंतर लगेचच, केवळ दोरी बांधून डवऱ्याच्या सहाय्याने गाळ पाडून घ्यावा. प्रत्येक तीन ओळीमधून पीक गादी वाफ्यावर करून घ्यावे. टॅ्रक्टरद्वारे पेरणी करायची झाल्यास सात दात्याच्या पेरणी यंत्राने पट्टावेट पद्धतीने पेरणी करायची झाल्यास सात दात्याच्या पेरणी यंत्राने पट्टापेर पद्धतीने पेरणी करावयाची झाल्यास पेरणी यंत्राच्या बियाण्यांच्या कप्प्यातील चवथे छिद्र बंद करावे . प्रत्येक वेळी ट्रॅक्टर पलटून येतांना एक ओळ खाली रेवावी (आठवी ओळ) म्हणजेच संपूर्ण शेतात प्रत्येक तीन ओळांना चौथी ओळ रिकामी राखली जाईल व प्रत्येक चौथ्या ओळीवर उवरणीच्या वेळी, उवरणी आटोपल्यानंतर एका डवऱ्याच्या सहायाने गाळ ओढून पट्टापेर पद्धतीने पीक गादी वाकयावर घ्यावा असा सल्ला शिवाजी कृषी महाविद्यालयाचे जितेंद्र दुर्गे व मनोज नवरे यांनी दिला आहे. पेरणीकरिता आणलेल्या बियाण्याची पिशवी खालून फोडावी बियाण्याची पिशीव पिशवीवरील टॅग जपून ठेवावी. साधारणत: ७५ ते १०० मि.म. पाऊस पडल्यानंतर जमिनीमध्ये पेरणी योग्य आलावा असतांनाच बियाण्याची पेरणी करावीे पेरणी योग्य ओलावा जमिन३ीमध्ये आहे किंवा नाही या करिता शेतातील मातीचा गोळा करावा तो व्यवस्थित घट्ट होतो की नाही दो पाहावा. तद्नंतर दूर फेकावा. तो गोळा फुटला असता पेरणी योग्य ओलावा नाही, असे समजावे. पेरणीपूर्वी बियाण्यास २-३ ग्राम कार्बोक्सिन ३७.५ व थायरम ३७.५ % (मिश्र घटक) या प्रमाणात लावावे. बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केल्यानंतर रायसोबियम जपोनिकम आणि स्फुरद विरघळणारे जिवाणू पी.एस. बी. २५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास पेरणीपूर्वी लावू नंतर पेरणी करावी. पेरणी सरत्याने करावी दोन ओळीतील व दोन रोपातील अंतर ४५ बाय ५ से.मी. ठषवावे, भरघोस उत्पादनासाठी हेक्टरी झाडांची संख्या ४ ते ४.५ लाखापर्यंत ठेवावी. पेरणी उताराला आडवी तसेच पूर्व पश्चिम करावी. शेतकरी पेरणी योग्य जमीन तयार करण्यासाठी यांत्रिकीकरणाचा अवलंब करतात. यामुळे जमीन भुसभुशीत होते, अशा जमिनीत पेरणी ट्रॅक्टरने केल्यास बियाणे अधिक खोलीवर पडते. खोल पेरणीनंतर किंवा अधिक हाताळणी झाल्यास त्याची उगवण कमी होते, अशी माहिती प्रादेशिक संशोधन केंद्राचे योगेश इंगळे, मंगेश दांडगे यांनी दिली.

पट्टापेर पद्धतीचे फायदे
बियाण्यांचे प्रमाण कमी लागते, बियाणे खर्चात बचत होते, पेरणी लवकरच व सोईची होते, शेतात वेळोवेळी पेरफटका मारणे सोईचे होते, किडी व रोगांची निगारणी व निरीक्षण शक्य होते, प्रत्येक पट्ट्यात फवारणी योग्य रितीने करता येते, शेतात हवा खेळती राहते, सूर्यप्रकाशासाठीची स्पर्धा कमी होते, सरीच्या वाटे ओलीत करता येते, तुषार सिंचन करणे सोईचे होते. काठावरील ओळींना बॉर्डर इफेक्ट मिळतो, शेतात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे मुलस्थानी संवर्धन शक्य होते, प्रत्येक पट्ट्यात िपकाचे काटेकोर व्यवस्थापन शक्य होते, प्रत्येक पट्ट्यात पिकाची एकसमान वाढ मिळते, प्रत्येक पट्ट्यात पिकाची एकसमान वाढ मिळते, पिक गादीवाफ्यावर असल्यामुुळे पावसाचे पाणी व पिक यांचा सरळ संबंध टाळता येतो, मुलस्थानी पावसाच्या पाण्याच्या संवर्धनाचा माध्यमातून जमिनीतील ओल शेवटपर्यंत टिकवून ठेवल्यास मदत होते.

Web Title: Need soybean planting technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.