कृषी हरित क्रांतीसाठी प्रामाणिक प्रयत्नांची गरज
By Admin | Updated: July 2, 2015 00:18 IST2015-07-02T00:18:28+5:302015-07-02T00:18:28+5:30
राज्याचे माजी मुख्यमंत्री कै .वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल घडून आणली ...

कृषी हरित क्रांतीसाठी प्रामाणिक प्रयत्नांची गरज
कृषी दिन : पालकमंत्री पोटे यांचे प्रतिपादन
अमरावती : राज्याचे माजी मुख्यमंत्री कै .वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल घडून आणली त्यानी केलेल्या कृषी क्षेत्रातील हरित क्रांतीचा वसा पुढे नेण्यासाठी प्रयन्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.
तेकृषी विभाग महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषद कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या डॉ पंजाबराव देशमुख सभागृहात बुधवारी आयोजित कृषी दिन व कृषी जागूती सप्ताह शुभारंभ कार्यक्रमाला मार्गदर्शन करतांना बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कृषी सभापती अरूणा गोरले, उदघाटक म्हणून अध्यक्ष सतीश उईके, तर प्रमुख पाहूणे म्हणून पालकमंत्री प्रवीण पोटे, जिल्हाधिकारी किरण गित्ते, सभापती सरिता मकेश्र्वर, गिरीष कराळे, मुख्यकार्यकारी अधिकारी सुनिल पाटील, कृषी अधिक्षक अधिकारी दत्रातय मुळे, कृषी विकास अधिकारी उदय काथोडे, हरिभाऊ बाप्तीवाले, कवडे, जि.प.सदस्य बापुराव गायकवाड, मंदा गवई, कुरेसाबी पटेल, आदीची उपस्थिती होती. याप्रसंगी सीईओ सुनील पाटील, यांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगत कृषी विभागाच्या माध्यमातून अधिकाधिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले. कवळे, सभापती अरूणा गोरले, कृषी अधीक्षक अधिकारी यांनीसुध्दा मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन क्षीरसागर यांनी तर आभार प्रदर्शन देशमुख यांनी केले.