२० ग्रॅमची चेन हवी, विवाहितेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:12 IST2021-02-08T04:12:37+5:302021-02-08T04:12:37+5:30

अमरावती : १० ग्रॅमची चेन दिली आहे. ती नको, २० ग्रॅमची सोन्याची चेन हवी, असा तगादा लावत पती व ...

Need a 20 gram chain, marital harassment | २० ग्रॅमची चेन हवी, विवाहितेचा छळ

२० ग्रॅमची चेन हवी, विवाहितेचा छळ

अमरावती : १० ग्रॅमची चेन दिली आहे. ती नको, २० ग्रॅमची सोन्याची चेन हवी, असा तगादा लावत पती व सासरच्या मंडळींनी विवाहित महिलेचा छळ केला. ही घटना मुंबई येथे १० ऑक्टोबर २०२० ते ६ फेब्रुवारी दरम्यान घडली.

अमरावती माहेर असलेल्या महिलेच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी आरोपी राजेंद्र ब्रम्हानंद कोडापे (३०), दोन महिला, दिलीप वलके, अजय वलके, अजय कुलसंगे (सर्व रा. प्लॉट नंबर ३०१, माताछाया इमारत, ९-२० फणस पाडा, सीबीडी बेलापुरा, नवी मुंबई) यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ४९८ (अ), ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. लग्नाच्या वेळी महिलेच्या वडिलांनी १० ग्रॅमची चेन दिली. मात्र, सोन्याची चेन २० ग्रॅमची हवी होती, असे म्हणत सदर महिलेला पती व सासरच्या मंडळींनी मानसिक व शारीरिक छळ केला. शिवीगाळ केली. गाडगेनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ४९८ (अ), ३४ अन्वये गुन्हा नोंदविला.

Web Title: Need a 20 gram chain, marital harassment