कुपोषणमुक्तीसाठी बालकांना अमृत आहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:24 IST2021-02-05T05:24:57+5:302021-02-05T05:24:57+5:30

अमरावती: कुपोषणाचे प्रमाण कमी करणे माता व बालमृत्यू रोखणे या मुख्य उद्देशाने राज्याच्या आदिवासी विकास विभाग व महिला व ...

Nectar diet for malnutrition | कुपोषणमुक्तीसाठी बालकांना अमृत आहार

कुपोषणमुक्तीसाठी बालकांना अमृत आहार

अमरावती: कुपोषणाचे प्रमाण कमी करणे माता व बालमृत्यू रोखणे या मुख्य उद्देशाने राज्याच्या आदिवासी विकास विभाग व महिला व बाल विकास विभागाच्या समन्वयाने भारतरत्न डॉ.ए.पी. जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडे चालू आर्थिक वर्षात ११ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून गरोदर महिला, स्तनदा माता व ७ महिने ते ६ वर्षे वयोगटांतील बालके आदींना लाभ मिळणार आहे.

जिल्ह्यातील मेळघाटात असलेल्या धारणी व चिखलदरा या दोन तालुक्यांमध्ये भारतरत्न डॉ.ए.पी. जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना राबविण्यात येत आहे. याकरिता शासनाकडून उपलब्ध झालेल्या ११ काेटींच्या निधीमधून धारणी व चिखलदरा तालुक्यातील दोन प्रकल्पांच्या माध्यमातून अमृत आहार योजनेच्या माध्यमातून कुपोषणाचे प्रमाण कमी करणे माता व बालमृत्यू रोखण्यात मुख्य उद्देशाने आदिवासी विभाग महिला व बालकल्याण विभागाच्या समन्वयातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

बॉक्स

योजनेचे वैशिष्ट्य

अंगणवाडी गरोदर महिलेची नोंद झाल्यापासून तिचे जन्मलेले बाळ सहा महिन्याचे होईपर्यंत आठवड्यातील सहा दिवस चौरस आहार असलेले एक वेळचे जेवण देण्याची तरतूद, तसेच सहा महिने ते सहा वर्षांपर्यंतच्या बाळाला दररोज एक उकडलेले अंडे देण्याची तरतूद या योजनेत आहे.

बॉक्स

आहाराचे स्वरूप

या योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या एक वेळच्या पूर्ण आहारामध्ये चपाती अथवा भाकरी, भात, कडधान्य, डाळ, सोया दूध साखरेसह, शेंगदाणा लाडू, अंडी अथवा केळी अथवा नाचणी, हलवा, फळे, हिरव्या पालेभाज्या, खाद्यतेल गूळ वा साखर, आयोडीनयुक्त मीठ, मसाला इत्यादींचा समावेश आहे.

कोट

कुपोषणावर मात करण्यासोबतच माता व बालमृत्यू रोखणे हा अमृता योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. या योजनेचे मेळघाटमधील दोन तालुक्यांतील ४६३ अंगणवाडी यात समाविष्ट आहेत, ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

प्रशांत थोरात

उपमुख्य कार्यकारी अधिकारी

बॉक्स

दृष्टिक्षेपात

योजनेंतर्गत येणारे तालुके २

प्रकल्प संख्या २

अंगणवाडी केंद्र ४६३

गरोदर महिला २,८०८

स्तनदा माता ३,४६७

सात महिने ते सहा वर्षे वयोगटांतील बालके ३२,७७३

Web Title: Nectar diet for malnutrition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.