शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

मोर्शीच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या मेघना मडघे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 16:29 IST

 शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पार्टी, बहुजन मुक्ती पार्टी यांनी त्यांच्या विजयाचा जल्लोष केला.

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मोर्शी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेघना मोहन मडघे थेट जनतेतून निवडून आल्या आहे. त्यांच्यापूर्वी नगराध्यक्ष असलेल्या शीला रोडे यांच्या आकस्मिक निधनाने ही निवडणूक पार पडली.रिंगणात असलेल्या पाच उमेदवारांपैकी मेघना मडघे यांच्या पारड्यात एकूण १६,३४३ पैकी १०८२० मतदान पडले. भाजपच्या अश्विनी सुशील वानखडे यांन ३४७७, काँग्रेसच्या स्वाती मिलिंद पन्नासे यांना १६२३ मते प्राप्त झाली. अपक्ष उमेदवार सुनील धोंडू कुमरे यांना १३४, तर पूनम असलमशहा यांना १३२ मते मिळाली.  शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पार्टी, बहुजन मुक्ती पार्टी व मुस्लिम जनसमुदायाने त्यांच्या विजयाचा जल्लोष केला. माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख, आमदार देवेंद्र भुयार यांनी या विजयासाठी परिश्रम घेतले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूकAmravatiअमरावती