तिवसा येथे राष्ट्रवादीचे रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:13 IST2021-04-22T04:13:39+5:302021-04-22T04:13:39+5:30

तिवसा : राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तिवसा ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबिर पार पडले. यात ४६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, ...

NCP's blood donation camp at Tivasa | तिवसा येथे राष्ट्रवादीचे रक्तदान शिबिर

तिवसा येथे राष्ट्रवादीचे रक्तदान शिबिर

तिवसा : राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तिवसा ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबिर पार पडले.

यात ४६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, तालुकाध्यक्ष सुभाष तवर, शहराध्यक्ष अजय सुरटकर, युवक तालुकाध्यक्ष हेमंत बोबडे, विलास वावरे, पुरुषोत्तम दाते, संजय पोल्हाड, आकाश लांजेवार, मोहन अर्मळ, विजय पाटील, निखिल प्रधान, आनंद सुरटकर, स्वप्निल शापामोहन, विकी साबळे आदी उपस्थित होते.

------------------

गच्चीवर निद्राधीन इसमाच्या घरी चोरी

शेंदोळा बु. : तिवसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सातरगाव येथे सुरेश मोडक (४०) यांच्या घरातून १३ हजार रोख व आठ हजारांचा दागिना अज्ञात चोरट्याने पळविला. ही घटना १९ एप्रिल रोजी घडली त्यावेळी ते गच्चीवर झोपायला गेले होते. तिवसा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

--------------

विहिरीवरील मोटरपंप लंपास

कुऱ्हा : तरोडा शिवारातील मधुकर निमकर (६०, रा. गुंजी, ता. धामणगाव रेल्वे) यांच्या शेतातील मोटरपंप व केबल असा २० हजारांवर साहित्य लंपास करण्यात आले. १४ ते १६ एप्रिल दरम्यान ही घटना घडली. त्यांनी २० एप्रिल रोजी तक्रार दाखल केली.

----------

अंजनगावात शेतमजूर महिलेचे घर फोडले

अंजनगाव सुर्जी : शेतात मजुरीसाठी गेलेल्या महिलेच्या घरातून अज्ञात चोरट्याने २० हजार रुपये रोख, २३ ग्रॅम सोन्याचे दागिने असा ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. २० एप्रिल रोजी ही घटना घडली. अंजनगाव सुज४ी पोलिसांनी देवकाबाई गव्हाळे (४६, रा. मोचीपुरा) यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध भादंविचे कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला.

----------------

व्यायामपटूला कुंभारगाव फाट्यावर दुचाकीची धडक

वनोजा बाग : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील रहिमापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंभारगाव फाट्यावर २० एप्रिल रोजी सकाळी व्यायाम करीत असलेल्या अजय नामक मुलाला दुचाकीने धडक दिली. यामध्ये अजय हा जखमी झाला. याप्रकरणी पोलिसांनी एमएच ३० एएच ३१८७ क्रमांकाच्या दुचाकीच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

------------

नांदगाव-सावनेर मार्गावर अपघात

नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील सावनेर मार्गावर ऑटोरिक्षा क्रमांक एमएच २७ पी १८२५ क्रमांकाची ऑटोरिक्षा १० एप्रिल रोजी दुपारी १ च्या सुमारास उलटली. याप्रकरणी सुमन भडके (७१, रा. सावनेर) यांच्या तक्रारीवरून चालक हेमंत रघुनाथ खडसे (४८, रा. सावनेर) याच्याविरुद्ध भादंविचे कलम २७९, ३३७, ३३८ अन्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

------------

Web Title: NCP's blood donation camp at Tivasa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.