नवनीत राणा यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 23:19 IST2019-07-04T23:19:00+5:302019-07-04T23:19:13+5:30
खासदार नवनीत राणा यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी जिल्ह्यासह विदर्भातील शेतकरी, शेतमजूर व जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे पंतप्रधानांसोबत संवाद साधला. उपस्थित आमदार रवि राणा यांनीसुद्धा विविध विषयांकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधले.

नवनीत राणा यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : खासदार नवनीत राणा यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी जिल्ह्यासह विदर्भातील शेतकरी, शेतमजूर व जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे पंतप्रधानांसोबत संवाद साधला. उपस्थित आमदार रवि राणा यांनीसुद्धा विविध विषयांकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधले.
अमरावती जिल्ह्याचे विभाजन करून अचलपूर जिल्ह्याची निर्मिती करण्यात यावी, चिखलदऱ्याचा महाबळेश्र्वर, माथेरान या पर्यटन स्थळाच्या धर्तीवर विकास करण्यासाठी भरीव निधी द्यावा, बेलोरा विमातळ तातडीने सुरू करावे, नांदगाव पेठ येथील औद्योगिक वसाहतीमध्ये मोठे उद्योग उभारावेत, महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, तसेच पेरणी ते कापणीपर्यंतचा शेतकºयांना आलेल्या खर्चापेक्षा मूळ किमतीच्या दीडपट भावाने राज्य शासनाने शेतमालाची थेट खरेदी करावी, ज्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकेल, विदर्भातील बंद पडलेले सिंचन प्रकल्प तातडीने सुरू करावेत, संजय गांधी, श्रावणबाळ, दिव्यांग, विधवा यांचे शासनाच्या योजनेचे अनुदान ६०० रुपयांऐवजी दोन हजार रुपये करण्यात यावे, सिंचन प्रकल्पासाठी संपादित शेतजमीनीचा मोबदला २ च्या गुणकाप्रमाणे देण्यात यावा आदी महत्त्वाच्या विषयांवर खा.नवनीत राणा यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत चर्चा करून याबाबत लेखी निवेदन दिले. यावर पंतप्रधानांनी योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन खासदार नवनीत राणा यांना दिले.