नवनीत राणा यांचे पहिले वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 12:23 IST2019-07-23T12:18:22+5:302019-07-23T12:23:22+5:30

खासदार नवनीत राणा यांनी त्यांना मिळालेले खासदारकीचे पहिले वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले.

Navneet Rana's first salary to Chief Minister's relief Fund | नवनीत राणा यांचे पहिले वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

नवनीत राणा यांचे पहिले वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

ठळक मुद्देधनादेश सुपूर्ददुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्य दुष्काळाच्या छायेत आहे. सार्वत्रिक पाऊस नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे खासदार नवनीत राणा यांनी त्यांना मिळालेले खासदारकीचे पहिले वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले. मदतीचा धनादेश खासदार राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईत ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर सोमवारी सुपूर्द केला. यावेळी बडनेऱ्याचे आमदार रवि राणा उपस्थित होते. यावेळी राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्ह्यातील पीक परिस्थितीची माहिती देऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मागणी केली.

Web Title: Navneet Rana's first salary to Chief Minister's relief Fund