शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

नवनीत राणा मिश्कीलपणे बोलल्या हो! : बावनकुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2024 11:32 IST

‘बाहेरचा’ मुद्दा विरोधकांकडून ‘इनकॅश’!

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : नवनीत राणांनी पत्रकाराला उत्तर दिले नाही, तर त्या मिश्कीलपणे बोलल्या, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी  प्रसारमाध्यमांना दिली आहे. त्यात एवढे सीरिअस नाही, असे सांगून त्यामुळे काहीतरी समज-गैरसमज तयार होत असल्याचे मात्र ते म्हणाले. मला असे वाटते की, बच्चू कडूंबाबत बोलत असताना चुकीचा रेफरन्स आला आहे, असा दावादेखील बावनकुळे यांनी केला. ‘नवरा-बायकोमध्ये बाहेरच्यांनी बोलू नये,’ असे वक्तव्य राणा यांनी बावनकुळे यांना उद्देशून केले होते. त्यावर बावनकुळे यांना छेडले असता, त्यांनी आपली व त्यांची भूमिका वेगळी नसल्याचे सांगितले.  

‘बघा, बघा, दुसरा उमेदवारच मिळाला नाहीतिकिटासाठी युवा स्वाभिमान सोडून भाजपमध्ये डेरेदाखल झालेल्या राणा यांचे ‘नवरा-बायकोमध्ये बाहेरच्यांनी बोलू नये’ हे वक्तव्य विरोधकांच्या प्रचाराचा, टीकेचा मुद्दा ठरला आहे. आपण किती लाचारी स्वीकारावी, असा खडा सवाल ‘प्रहार’चे संस्थापक तथा आमदार बच्चू कडू यांनी भाजपला केला आहे. आ. यशोमती ठाकूर यांनी ‘आम्ही अनुभवले, आता भाजपची पाळी,’ म्हणून स्थानिक भाजप नेत्यांना टोला लगावला आहे. राणांचे ते वक्तव्य सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. ते वक्तव्य स्वकीयांना पचविणे जड झाले असताना दुसरीकडे विरोधक व रिंगणातील प्रतिस्पर्ध्यांकडून ते ‘इनकॅश’ करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. ‘बघा, बघा, भाजपला दुसरा उमेदवारच मिळाला नाही. युवा स्वाभिमानमधून आयात केलेला उमेदवार केवळ तिघांना नेता मानतो, तर बाकीच्यांना काय?’ असा सवाल सोशल मीडियावरून विचारला जात आहे.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेnavneet kaur ranaनवनीत कौर राणाBJPभाजपा