इंग्रजकालीन शाळेला वाळवंटाचे स्वरूप

By Admin | Updated: May 28, 2016 00:08 IST2016-05-28T00:08:42+5:302016-05-28T00:08:42+5:30

येथील ब्रिटिशकालीन गर्ल्स हायस्कूलच्या सहा एकर परिसराला वाळवंटाचे स्वरूप आले आहे.

The nature of the desert to the British school | इंग्रजकालीन शाळेला वाळवंटाचे स्वरूप

इंग्रजकालीन शाळेला वाळवंटाचे स्वरूप

मैदानावर कचऱ्याचे ढिगारे : विद्यार्थ्यांची गैरसोय, हिरवळ लोप पावतेय
मनीष कहाते अमरावती
येथील ब्रिटिशकालीन गर्ल्स हायस्कूलच्या सहा एकर परिसराला वाळवंटाचे स्वरूप आले आहे. मैदानावरील झाडे वाळली आहेत. मैदानात उभी असलेली भंगार वाहने येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधत आहे. मैदानात कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे शिक्षण घेत असलेल्या मुलांचे मन प्रसन्न कसे राहणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सन १९१२ साली गर्ल्स हायस्कूलची स्थापना झाली. ६ एकर परिसरात शाळेची प्रशस्त २२ वर्ग खोल्यांची इमारत आहे. त्यामध्ये ७३४ विद्यार्थी शिकत आहेत. त्यांना शिकविण्याकरिता २२ शिक्षक आहेत. शाळेची साफसफाई करण्यासाठी पाच परिचर आहेत. काही शिक्षकेतर कर्मचारी आहेत. एवढा मोठा डोलारा सांभाळण्याकरिता वर्षभरापासून प्रभारी मुख्याध्यापक आहेत. शाळेत अमरावती तालुक्यातील यावली, मावली, नवसारी, कठोडा, वडाळी आणि अमरावती शहरातील मुली मोठ्या संख्येने येथे शिकण्यासाठी येतात. शाळेच्या परिसरात प्रवेश करताच मुलांना सुकलेली झाडे, भंगार, वाहन, अस्तव्यस्त लागलेल्या वाहनांच्या रांगा, दृष्टिक्षेपात पडते. कुठेच प्रसन्नतेचे वातावरण दिसत नाही. मैदानाचे सपाटीकरण नाही. दोन क्वार्टर मुख्याध्यापकांकरिता बांधलेले दिसतात. परंतु तिथेही कोणत्या सोयी सुविधा नाही.
शाळेच्या परिसरात जि.प. शिक्षण विभागाच्या विविध कार्यालये आहेत. त्यातच प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यालय आहे. त्यामुळे परिसरात दिवसभर लोकांची वर्दळ राहते. मात्र परिसर पाहून मन उदास होते. सुकलेली भकास झाडांमुळे शाळेला मैदानाचे स्वरुप आले.

Web Title: The nature of the desert to the British school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.