राष्ट्रसंतांची ग्रामगीता यू ट्यूबवर, आरती हिंदी, मराठीत
By Admin | Updated: May 3, 2016 00:25 IST2016-05-03T00:25:35+5:302016-05-03T00:25:35+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे साहित्य जगभऱ्यातील लोकांना उपलब्ध व्हावे, त्यांना ऐकता यावे.

राष्ट्रसंतांची ग्रामगीता यू ट्यूबवर, आरती हिंदी, मराठीत
अमरावती : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे साहित्य जगभऱ्यातील लोकांना उपलब्ध व्हावे, त्यांना ऐकता यावे. यासाठी संपूर्ण ग्रामगीता, पसायदान, संत आडकोगी महाराज स्तवन, राष्ट्रसंतांचे जीवनदर्शन, राष्ट्रसंतांचा अतिसंदेश व ग्रामगीतेची हिंदी तसेच मराठीमधील आरती आता यू ट्यूबवर उपलब्ध आहे.
महाराजांचा ग्रामजयंती महोत्सव ३० एप्रिल रोजी पार पडला. या पर्वावर काही दिवसांपूर्वीच ही ग्रामगीता ऐकण्यासाठी उपलब्ध करण्यात आली होती. गाव विकासाची संकल्पना, युगग्रंथ ग्रामगीतेच्या ४१ विषयांतून प्रकट करणाऱ्या वंदनीय राष्ट्रसंतांची ही जयंती होय. ज्यावेळी राष्ट्रसंतांचा जन्मदिन अखिल भारतीय गुरुदेव मंडळाचे प्रचारक, कार्यकर्ते व प्रेमीजनांनी साजरा करण्याचा विचार राष्ट्रसंतांसमोर मांडला. त्यावेळी महाराजांनी स्पष्ट केले की, मित्रांनो जयंती साजरी करण्याची प्रथा मला अमलात आणू द्यायची नाही. माझा जन्मदिन साजरा करण्याचे खूळ म्हणजे मंडळाने माझे स्मरण चिंतनाने करावे, मी माझ्या मनात मानवमात्राचे उत्थान करणारी देवता शोधत होतो. तेव्हा मानवजातीच्या कल्याणांच्या दृष्टीने ग्रामदेवता मला बरी वाटली. ग्राम जयंती नागरिकापर्यंत पोहोचायला हवी, असा मंत्र दिला. त्यांच्या विचारांचे आम्ही पालन करणार असल्याचे गुरुकुंज मोझरी येथील राजेश बोबडे यांनी सांगितले.