टोल नाका हटविण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन
By Admin | Updated: March 22, 2015 01:25 IST2015-03-22T01:25:20+5:302015-03-22T01:25:20+5:30
मोर्शी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने जिल्हाध्यक्ष ऋषिकेश वैद्य यांच्या नेतृत्वात नांदगाव पेठ येथील टोल नाका हटविण्यासाठी २४ मार्च रोजी आंदोलन ..

टोल नाका हटविण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन
मोर्शी : मोर्शी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने जिल्हाध्यक्ष ऋषिकेश वैद्य यांच्या नेतृत्वात नांदगाव पेठ येथील टोल नाका हटविण्यासाठी २४ मार्च रोजी आंदोलन छेडण्याचा इशारा युवक काँग्रेस मोर्शी तालुका अध्यक्ष अतुल उमाळे यांनी दिला आहे. याबाबत मोर्शी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसची बैठक पाटील पटवारी सराय संस्था मोर्शी येथे पार पडली.
निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र शासनाच्यावतीने टोलमुक्ती करण्याचा वाजागाजा करण्यात आला. मात्र टोलमुक्ती भारत अद्यापही करण्यात आला नाही. मोर्शी-वरूड येथून अनेक नागरिकांना अमरावती येथे नेहमीच ये-जा करावे लागते.
टोलनाक्यापासून अमरावतीचे अंतर केवळ चार ते पाच किलोमीटर इतके असून टोलनाक्यावर अव्वाच्या सव्वा पैसे मोजावे लागतात. त्यामुळे दोन्ही तालुक्यांत जाणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत आहे.
नांदगावपेठ येथील टोल नाका त्वरित हटविण्यात यावा यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने २४ मार्च रोजी तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
या आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हृषीकेश वैद्य, तालुकाध्यक्ष अतुल उमाळे, तालुकाध्यक्ष प्रकाश अढाऊ, राजेश पाटील, पंचायत समिती सदस्य अनिल अमृते, सरपंच नरेंद्र जिचकार, प्रकाश विघे, पंकज विधळे, संजय सोनटक्के, विलास राऊत, विलास सोलव, मोहन मडघे, मोहीबखान, विलास ठाकरे, आशिष कोंडे, विजय गावंडे, राजू जिजाने, सचिन जेवडे, रूपेश अंधारे, विनोद ढवळे, योगेश धोटे, नितीन देशमुख, अनिल चिखले उपस्थित राहणार आहे. (प्रतिनिधी)