अनधिकृत मालमत्तेच्या चौकशीसाठी राष्ट्रवादी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:27 IST2021-02-05T05:27:36+5:302021-02-05T05:27:36+5:30

अमरावती : शहरातील अनधिकृत मालमत्तांची चौकशी करून त्यांच्याकडे थकीत असलेली रक्कम वसूल करावी, या मागणीसाठी बुधवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने आक्रमक ...

Nationalist aggressors for investigating unauthorized assets | अनधिकृत मालमत्तेच्या चौकशीसाठी राष्ट्रवादी आक्रमक

अनधिकृत मालमत्तेच्या चौकशीसाठी राष्ट्रवादी आक्रमक

अमरावती : शहरातील अनधिकृत मालमत्तांची चौकशी करून त्यांच्याकडे थकीत असलेली रक्कम वसूल करावी, या मागणीसाठी बुधवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन नियमबाह्य मालमत्ताधारकांविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली.

आयुक्त प्रशांत राेडे यांना दिलेल्या निवेदनात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अमरावती विधानसभा अध्यक्ष धीरज श्रीवास यांनी येथील राजापेठ स्थित श्रीराम मंदिर या नावाने ट्रस्ट असून, त्यांचे दीर्पाचन हॉलदेखील आहे. ही संस्था धर्मादाय आयुक्तांच्या निर्देशानुसार कामकाज करीत नाही, असा आरोप करण्यात आला. संस्थेचे लेखापरिक्षण झाले नाही. दीर्पाचन हॉलमध्ये लग्न, सार्वत्रिक कार्यक्रम घेण्यात येते. संस्थेच्या जागेवर भाडेकरू, दुकाने, व्यवसाय सुरू आहे. तखतमल स्टेट हे व्यापारी संकुल, दीपा एज्युकेशन शाळासुद्धा आहे. ट्रस्टच्या नावे व्यापार चालविला असून, या नियमबाह्य कारभारावर अंकुश लावण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी धीरज श्रीवास, प्रशांत धर्माळे, गजानन रेवाळकर, वाहेद खान, नीलेश शर्मा, श्रीधार देशमुख आदी उपस्थित होते.

-------------------------

कोट

श्रीराम मंदिर ट्रस्टबाबतचे निवेदन प्राप्त झाले आहे. याबाबत सखोल चौकशी केली जाईल. चौकशीअंती कायदेशीर कारवाईचा निर्णय घेण्यात येईल.

- प्रशांर रोडे, आयुक्त, महापालिका.

Web Title: Nationalist aggressors for investigating unauthorized assets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.