शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
3
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
4
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
5
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
6
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
7
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
8
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
9
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
10
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
11
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
12
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
13
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
14
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
15
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
16
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
17
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
18
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
19
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
20
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ

हरिसाल येथे वन्यजीव व्यवस्थापनावर राष्ट्रीय परिसंवाद, देशातील ८० शास्त्रज्ञांचा सहभाग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2017 20:27 IST

अमरावती : शिवाजी शिक्षण संस्थाद्वारे संचालित जे. डी. पाटील सांगळुदकर महाविद्यालयाच्या वतीने व इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन कोलकाताद्वारा पुरस्कृत तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवाद मेळघाटातील मुठवा समुदाय संशोधन केंद्र बोरी हरिसाल येथे आयोजित करण्यात आले आहे.  

अमरावती : शिवाजी शिक्षण संस्थाव्दारे संचालित जे.डी. पाटील सांगळुदकर महाविद्यालयाच्यावतीने व इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन कोलकाताद्वारा पुरस्कृत तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवाद मेळघाटातील मुठवा समुदाय संशोधन केंद्र बोरी हरिसाल येथे आयोजित करण्यात आले आहे. परिसंवादाचे व कार्यशाळेचे उद्घाटन रविवारी इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन माजी अध्यक्ष अशोक कुमार सक्सेना यांच्या हस्ते झाले. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख होते. प्रमुख अतिथी म्हणून भारतीय विज्ञान काँग्रेसच्या सचिव विजयालक्ष्मी सक्सेना, शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष रामचंद्र शेळके, कार्यकारणी सदस्य केशवराव गावंडे, अतुल नेरकर आदींची उपस्थिती होती.  सायन्स अँड इको सिस्टिम्स इन इंडिया असा या राष्ट्रीय परिसंवाद व कार्यशाळेचा विषय आहे. या परिसंवादात देशातील नामांकित ८० शास्त्रज्ञांनी सहभाग  नोंदविला.निसर्गरम्य मेळघाटातील सातपुडा पर्वतरांगेतील जैवविविधता २१ व्या शतकातील जीवतंत्रज्ञान कौशल्य, वन्यजीव व्यवस्थापन व त्याचे आजच्या  काळातील महत्त्व, वन्यजीव व्यवस्थापनात लोकसहभाग आदी विषयांवर अनेक तज्ज्ञांचे यावेळी मार्गदर्शन लाभले. विविध विषयात तज्ज्ञ प्राध्यापक आपला शोधप्रबंधदेखील यावेळी सादर करण्यात आहेत. या राष्ट्रीय परिषदेच्या आयोजनामध्ये भारतीय वन्यजीव संस्थान ह डेहरादून, सातपुडा फाऊंडेशन राजर्षी शाहू महाविद्यालय चांदूर रेल्वे, महात्मा फुले महाविद्यालय वरूड व मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय अमरावती यांचाही सहभाग आहे. पाहुण्यांचा परिचय प्राचार्य रामेश्वर भिसे यांनी दिला. प्रास्ताविक स्पायडर शास्त्रज्ञ अतुल बोडखे यांनी केले. राजेश उमाळे यांनी कोळी गीताने पाहुण्यांचे स्वागत केले. 

 मेळघाटातील विविध वन्यजीवांचा अभ्यास व पेपर प्रेजेंटेशन करण्यासाठी या प्रदर्शनीत ८० शास्त्रज्ञ सहभागी झाले होते. सी.सी.एम.डी. हैद्राबाद संस्थेचे डॉ सुनील कुमार यांनी वन्यजीवांच्या डीएनएबद्दल माहिती दिली. वन्यजीवांचे क्राईम  कसे वाढत आहे, यासंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले. डॉ. हबीबा बिलाल डेहरादून यांनी वाघ जंगलातून कसा वावरतो, त्याला लावलेल्या कॉलर आयडसंदर्भात त्यांनी माहिती दिली. नागपुर येथील लालसिंग मीरी यांनी जंगलात विविध वृक्ष कशी जगवावी, त्यांचे संवर्धन कसे करावे याविषयी पेपर प्रझेंटेशन केले. यावेळी  महाराष्ट्र वाईल्ड लाईफचे वॉर्डन डॉ. ए.के. मिश्रा यांनीही कार्यशाळेला भेट देऊन मार्गदर्शन केले आहे.

टॅग्स :Amravatiअमरावतीscienceविज्ञान