जिजाऊ बँकेत राष्ट्रमाता जिजाऊ जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:12 IST2021-01-15T04:12:20+5:302021-01-15T04:12:20+5:30
महापालिका आयुक्तांची उपस्थिती, अमरावती : येथील खत्री कॉम्पलेक्स स्थित जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेच्या मुख्य शाखेत मंगळवारी राष्ट्रमाता राजमाता ...

जिजाऊ बँकेत राष्ट्रमाता जिजाऊ जयंती साजरी
महापालिका आयुक्तांची उपस्थिती,
अमरावती : येथील खत्री कॉम्पलेक्स स्थित जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेच्या मुख्य शाखेत मंगळवारी राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त प्रशांत रोडे व बँकेचे अध्यक्ष अविनाश कोठाळे यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद व जिजाऊंच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी बँकेचे अध्यक्ष अविनाश कोठाळे यांनी बँकेच्या प्रगतीची माहिती दिली व जिजाऊंबदल मोलाचे विचार व्यक्त केले. यावेळी महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी बँकेच्या उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, विलासराव राऊत, शरद बंड, वानखडे, दिलीप डेहनकर, सुभाष जाधव, भुयार, आदींची उपस्थीती होती. बँकेची प्रभारी सीईओ हरीष नाशिरकर यांनी संचालन केले या प्रसंगी बँकेचे व्यवस्थापक विजय ढोले यांच्यासह अधिकारी कर्मचार्यांची उपस्थीती होती.