रात्री ११ वाजेपर्यंत फडकला शाळेत राष्ट्रध्वज
By Admin | Updated: May 3, 2015 00:29 IST2015-05-03T00:29:59+5:302015-05-03T00:29:59+5:30
दस्तूर नगरातील महापालिका शाळेत रात्री ११ वाजेपर्यंत राष्ट्रध्वज उतरविण्यात न आल्याने दोन मुख्याध्यापकांविरुध्द.....

रात्री ११ वाजेपर्यंत फडकला शाळेत राष्ट्रध्वज
दस्तूर नगरातील महापालिका शाळेतील घटना : दोन मुख्याध्यापकांविरुद्ध तिरंगा अवमानाचा गुन्हा दाखल
अमरावती : दस्तूर नगरातील महापालिका शाळेत रात्री ११ वाजेपर्यंत राष्ट्रध्वज उतरविण्यात न आल्याने दोन मुख्याध्यापकांविरुध्द फे्रजरपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रफुल विजय अनिलकर (२८,रा.अमरनगर) व कविता उदयसिंग चव्हाण (३८,रा.जयंत कॉलनी) अशी, मुख्याध्यापकांची नावे आहेत.
महापालिकेच्या मराठी शाळा क्रमांक ११ व हिन्दी शाळा क्रमांक १३ मध्ये १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. दोन्ही शाळांची इमारत एकच असल्यामुळे शाळा व्यवस्थापनाकडून सकाळी ७ वाजता ध्वजारोहण कार्यक्रम घेण्यात आला.
इत्तमगावात ध्वजारोहण झालेच नाही
इत्तमगाव या शहिदांच्या भूमीत ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण झालेच नाही. याबाबत पंचायत समिती प्रशासनाला माहिती असतानासुध्दा दुर्लक्ष केले गेले. इत्तमगाव ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्र दिनाला सचिव आणि प्रशासकाने ध्वजारोहण केले नाही. याबाबत तरुणांनी सचिवाला माहिती दिली. पण माझ्याकडे चार ग्रामपंचायतींचा कारभार असल्याने हे शक्य होत नसल्याचे सांगून बोळवण करण्यात आले. महाराष्ट्र दिनाला ध्वजारोहन आणि ग्रामसभा घेण्यात येणार असल्याची मुनादी देण्यात आली होती. १ मे रोजी सकाळी ग्रामवासी कार्यालयात आले. मात्र सचिव आणि प्रशासक अनुपस्थित असल्याने ध्वजारोहण झालेच नाही.
ग्रामपंचायत, सेवा सोयायटीने केला अवमान
भिलोना येथील ग्रामपंचायत व सेवा सोयायटीकडून १ मे रोजी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. मात्र, सायंकाळी ६ वाजेपर्यंत राष्ट्रध्वज उतरविण्यात आला नाही. रात्रभर राष्ट्रीय ध्वज फडकत राहिल्याचे लक्षात येताच पथ्रोट पोलिसांनी ग्रामसेवक अवघड, चपराशी खेडकर व सेवा सहकारी सोसायटीचे सचिव रहाटे यांच्याविरुध्द ध्वज अवमानाचा गुन्हा दाखल केला. बीट जमादार संजय इंगळे, अवधूत सगणे व पुरुषोत्तम माकोडे यांनी ही कारवाई केली.