शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

पुणे येथे १० डिसेंबरपासून शेतकरी संघटनेची राष्ट्रीय किसान परिषद; विविध राज्यांतील शेतकरी सहभागी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 15:34 IST

शेतकरी संघटनेच्यावतीने पुण्याच्या नवी पेठमध्ये राष्ट्रीय किसान परिषदेचे आयोजन १० डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. शरद जोशी व बाबू गेणू स्मृत्यर्थ आयोजित ही परिषद १२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

ठळक मुद्देकायदे व धोरण बदलविण्याच्या दृष्टीने विचार होणार

आॅनलाईन लोकमतअमरावती : शेतकरी संघटनेच्यावतीने पुण्याच्या नवी पेठमध्ये राष्ट्रीय किसान परिषदेचे आयोजन १० डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. शरद जोशी व बाबू गेणू स्मृत्यर्थ आयोजित ही परिषद १२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.देशाच्या स्वातंत्र्यापासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या चळवळीत ७० वर्षांत समस्या बिकट व जटील होत चालल्या आहेत. आंदोलनातून नेते तयार होतात. शेतकऱ्यांच्या हाती मात्र काहीच लागत नाही. सत्ताधारी व विरोधी पक्षांबाबतही हाच अनुभव आल्याने शेतकऱ्यांच्या हिताचा तिसरा पर्याय उपलब्ध करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय किसान परिषद होत आहे. यावेळी सुकाणू समितीचे सदस्य आणि देशभरातील शेतकरी नेते उपस्थित राहतील. शेतकऱ्यांच्या गळ्याला फास ठरणारे कायदे व धोरण बदलविण्याच्या दृष्टीने विधानसभेत आमदार व संसदेत खासदार निवडून देण्यासंबंधी देशव्यापी मोहिमेची चाचपणी यावेळी होईल, अशी माहिती सुकाणू समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य व विदर्भ शेतकरी संघटनेचे संयोजक धनंजय काकडे यांनी दिली.दरम्यान, राष्ट्रीय किसान परिषदेत १० डिसेंबरला रघुनाथदादा पाटील, चेगल रेड्डी (आंध्र प्रदेश), सतनामसिंग बेरू (पंजाब), दशरथ रेड्डी (आंध्र प्रदेश मार्गदर्शन करतील. ११ डिसेंबरला दोन सत्रांमध्ये रघुनाथदादा पाटील, श्रीगोपाल (तामिळनाडू), कालीदास आपेट, आ. बच्चू कडू, सतनामसिंग बेरू (पंजाब), समशेरसिंह दहिया (हरियाणा), बी.टी. अग्रवाल (राजस्थान), पार्थ शहा, हेरंब कुळकर्णी (दिल्ली), छावा संघटनेचे करण गायकर, मिलिंद मुरुगकर, शांताकुमार कुलबर्गी (कर्नाटक), बाळासाहेब पटारे (अहमदनगर), बाबा आढाव, कालीदास आपेट, दिनेश ओऊळकर (माजी सहकार आयुक्त) विविध विषयांवर मार्गदर्शन करतील. १२ डिसेंबरला शिवाजीनाना नांदखिले, योगेश दहिया (उत्तर प्रदेश), चंद्रशेखर (कर्नाटक), वीरेंद्रसिंह राय (बिहार), अनिल पाटील, तसनीम अहमद यांचे मार्गदर्शन होणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी