शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

नसीम हत्याकांडातील आरोपींची निर्दोष मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 23:28 IST

पोहरा येथील बहुचर्चित नसिम हत्याकांडातील आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. मोहम्मद नईमोद्दीन, वीरेंद्र रघुवंशी व मोहसिन कमाल अशी निर्दोष सुटका झालेल्यांची नावे आहेत. अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.

ठळक मुद्देपोहरा येथील बहुचर्चित प्रक रण : जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पोहरा येथील बहुचर्चित नसिम हत्याकांडातील आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. मोहम्मद नईमोद्दीन, वीरेंद्र रघुवंशी व मोहसिन कमाल अशी निर्दोष सुटका झालेल्यांची नावे आहेत. अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.विधी सूत्रानुसार, ३ सप्टेंबर २०१४ रोजी एका व्यक्तीला फे्रजरपुरा हद्दीतील जंगलात एका इसमाचा मृतदेह आढळून आला. या घटनेच्या माहितीवरून फे्रजरपुरा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तपासदरम्यान मृत व्यक्ती अब्दुल नसीम अब्दुल सत्तार असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस चौकशीदरम्यान आरोपी मोहम्मद नईमोद्दीन याने त्याचा मित्र वीरेंद्र रघुवंशी व मोहसिन कमाल यांना बोलावून जावई अब्दुल नसीमला मारून टाकल्याचे पुढे आले. पोलिसांनी तिघांनाही अटक करून त्यांच्यविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षाने एकूण सात साक्षीदार तपासले. सरकारी पक्षातर्फे आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध करण्यात आला. मात्र, दोन्ही पक्षाच्या युक्तिवादानंतर न्यायालयात आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध झाला नाही.असा झाला युक्तिवादआरोपीविरुद्ध परिस्थितीजन्य व तांत्रिक पुरावे सिद्ध होत आहेत. आरोपी मोहम्मद नईमोद्दीनकडे हत्या करण्याचा उद्देश होता, तो सिद्ध झाला. म्हणून आरोपींना शिक्षा देण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला. तर घटनेच्या तारखेला आरोपी व मृतक हे एकमेकांच्या सोबत होते, हे सिद्ध झाले नाही. आरोपी मोहम्मद नईमोद्दीन यानेच मृतकाला दोन हॉटेल खरेदी करून दिले होते. ही बाब सरकार पक्षाच्या साक्षीदारांच्या पुराव्यात उलट तपासणीदरम्यान लक्षात आणून देण्यात आली. जर आरोपीने मृताला हॉटेल खरेदी करून दिले, तर त्याला मारण्याचे कोणतेही कारण नव्हते व इतर परिस्थितीजन्य पुरावे व तांत्रिक पुरावे सिद्ध झाले नाही, म्हणून आरोपींना निर्दोष सोडण्यात यावे, अशा युक्तिवाद बचाव पक्षाचे वकील परवेज खान यांनी केला.आरोपी मोहसिन कमाल हा मुंबईचा रहिवासी असून, त्याचे व मृतकाचे कोणतेच वाद नव्हते. तो मुंबईहून अमरावतीत आला, ही बाब सिद्ध झाली नाही, असा युक्तिवाद अ‍ॅड. नरेंद्र दुबे यांनी केला. बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. परवेज खान यांना अनिल जयस्वाल, वसीम शेख व शहजाद शेख यांनी सहकार्य केले.