शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

पीएम’नी साधला प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांसोबत संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 19:08 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशभरातील प्रधानमंत्री आवास योजनेतील निवडक लाभार्थ्यांशी संवाद साधला. यात अमरावती महापालिका क्षेत्रातील १५ लाभार्थ्यांनी सहभाग घेतला.

अमरावती  - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशभरातील प्रधानमंत्री आवास योजनेतील निवडक लाभार्थ्यांशी संवाद साधला. यात अमरावती महापालिका क्षेत्रातील १५ लाभार्थ्यांनी सहभाग घेतला. अमरावतीच्या   लाभार्थ्यांची व्हिडीओ कॉन्फरन्स येथील जिल्हाधिकारी कार्यालय सकाळी ९.३० वाजता आयोजित करण्यात आली होती.        केंद्रशासनाच्या गृहनिर्माण व शहरी मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये जिल्हाधिकारी अभिजित बांगर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री आणि महापालिका आयुक्त हेमंत पवार यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते. महानगरपालिकेंतर्गत प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या घटक क्र. ४ मधील एकूण १५ पात्र महिला लाभार्थ्यांनी सहभाग घेतला होता. पंतप्रधानांनी या लाभार्थ्यांशी संवाद साधत योजनेतील अडथळ्यांविषयीचीही माहिती घेतली. तथा हक्काचे घरकुलाबाबत त्यांच्या भावना जाणून घेतल्या.या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या घटक क्र. ४ मधील घरकुलाचे जोत्यापर्यंतचे बांधकाम पूर्ण झालेल्या व अनुदानाचा पहिला टप्पा प्राप्त असलेल्या अशा एकूण १५ पात्र लाभार्थी महिला निवडण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये मायावती विलास मेश्राम, नंदा प्रकाश मुंगलकर, अनिता निरंजन बघेल, मेघा दिलीप थोरात, मीरा काशीनाथ यादव, लिलाबाई रामदास विघे, कल्पना दिलीप तेलमोरे, सुशीला दिपकराव जगताप, आशा नागेश जंगजोड, अर्चना दिनेश निकम, छाया अरविंद कढाणे, अनिता श्यामसिंग चव्हाण, कुंदा राजेश राऊत, बेबीनंदा संजय वाघमारे, पुष्पा दिनेशराव डोंगरे सहभागी झाल्या होत्या. यावेळी या १५ पात्र महिलांना जिल्हाधिकारी, यांच्याद्वारे या व्हिडीओ कॉन्फरन्सदरम्यान  उपस्थिती प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.यावेळी म्हाडाचे मुख्य अधिकारी सुभाष शिंदे, डी.आर.डी.ए.चे प्रकल्प संचालक अहमद, प्रभारी शहर अभियंता जीवन सदार, उपअभियंता सुनील चौधरी, समाज विकासतज्ज्ञ प्रदीप नितनवरे, पालिका आर्थिक तज्ज्ञ विपीन त्रिवेदी, नगररचनातज्ज्ञ अंकित साबळे, सल्लागार पीयूष हांडे व अन्य लाभार्थी उपस्थित होते.

टॅग्स :HomeघरAmravatiअमरावतीNarendra Modiनरेंद्र मोदी