नरेंद्र बेलसरे यांना नवरत्न दर्पण पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2016 00:10 IST2016-05-19T00:10:31+5:302016-05-19T00:10:31+5:30

संतनगरी शेगाव येथे १४ व १५ मे रोजी झालेल्या अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात लोकमतचे अकोला येथील प्रतिनिधी नरेंद्र बेलसरे यांना ...

Narendra Belsrere received the Navratna Chorus award | नरेंद्र बेलसरे यांना नवरत्न दर्पण पुरस्कार

नरेंद्र बेलसरे यांना नवरत्न दर्पण पुरस्कार

अमरावती : संतनगरी शेगाव येथे १४ व १५ मे रोजी झालेल्या अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात लोकमतचे अकोला येथील प्रतिनिधी नरेंद्र बेलसरे यांना नवरत्न दर्पण पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांना खा. प्रताप जाधव यांच्या हस्ते देण्यात आला. कार्यक्रमाला संग्रामपुर बाजार समितीचे सभापती पांडुरंग खांडे, कैलास बापू देशमुख, शर्वरी तुपकर यांची उपस्थिती होती. अकोला लोकमत कार्यालयातील नरेंद्र बेलसरे यांंना यापूर्वी लोकनायक बापूजी अणे, राष्ट्रीय ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार तसेच लोकमत समूहाचे सात पुरस्कार प्राप्त आहेत.

Web Title: Narendra Belsrere received the Navratna Chorus award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.