नांदगाव खंडेश्वर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 22:17 IST2017-10-12T22:17:45+5:302017-10-12T22:17:56+5:30

तालुक्यात पाऊस कमी झाल्याने उडीद-मुगाचे पीक हातचे गेले. सोयाबीनच्या उत्पादनात कमालीची घट झाली. खरीप हंगाम बुडाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

 Nandgaon Khandeshwar taluka declared drought affected | नांदगाव खंडेश्वर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा

नांदगाव खंडेश्वर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा

ठळक मुद्देशहर काँग्रेसची मागणी : तहसीलदारांना निवेदन, शेतकरी आर्थिक संकटात

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव खंडेश्वर : तालुक्यात पाऊस कमी झाल्याने उडीद-मुगाचे पीक हातचे गेले. सोयाबीनच्या उत्पादनात कमालीची घट झाली. खरीप हंगाम बुडाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने नांदगाव खंडेश्वर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या मागणीचे निवेदन नगराध्यक्ष अक्षय पारसकर यांच्या नेतृत्त्वात शहर काँग्रेस व शेतकºयांच्या वतीने तहसीलदार मनोज लोणारकर यांना देण्यात आले.
अल्प पावसामुळे सोयाबीनच्या शेंगा भरल्या नाहीत. त्यामुळे पीक कापणीच्या अगोदर पिकाची पाहणी करावी, असे निवेदनात नमूद आहे. यावेळी देवीदास सुने, विठ्ठल चांदणे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष अमोल धवसे, नगरसेवक गजानन मारोटकर, सभापती फिरोज खान, आदी उपस्थित होते.
 

Web Title:  Nandgaon Khandeshwar taluka declared drought affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.