बेनोड्यात नणंदेने मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:16 IST2021-01-19T04:16:23+5:302021-01-19T04:16:23+5:30

पान १ च्या बातमीतील बॉक्स बेनोडा शहीद : स्थानिक बेनोडा ग्रामपंचायतमध्ये भावजयीचा पराभव करत नणंदेने विजय मिळविला. तर, ...

Nanda killed Baji in Benoda | बेनोड्यात नणंदेने मारली बाजी

बेनोड्यात नणंदेने मारली बाजी

पान १ च्या बातमीतील बॉक्स

बेनोडा शहीद : स्थानिक बेनोडा ग्रामपंचायतमध्ये भावजयीचा पराभव करत नणंदेने विजय मिळविला. तर, एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या दोन सख्ख्या भावांना पराभव स्वीकारावा लागला.

येथून रजनी कुबडे, योगेश बारमासे, गोपाल नांदूरकर, मंगेश हुरडे, प्रिया राऊत, रूपेश निळकंठे, ज्ञानेश्वर युवनाते, दीपाली इंगोले, रूपराव खांडेकर, पूजा टेकाम, सुनीता कोठे, उत्तम पोटोडे, विशाखा दुपारे, दीपिका खुरसंगे, दीपक पंचभाई, संगीता अलोणे, दुर्गा चरपे हे १७ उमेदवार सदस्य म्हणून विजयी झाले. प्रभाग क्र. ३ मधून एकाच गटातून आमनेसामने उभ्या ठाकलेल्या दोन्ही सख्ख्या भावांना आपली अनामत रक्कम वाचविता आली नाही. याच प्रभागातील गाजलेल्या नणंद-भावजयीच्या तगड्या लढतीत नणंदेने बाजी मारली. संपूर्ण तालुक्यात चर्चिल्या गेलेल्या या लक्षवेधी लढतीत नणंद दीपाली मनोज इंगोलेने ४५० विजयी मते मिळवीत आपल्या भावजयीला २४५ मतांवर रोखण्यात यश मिळविले.

Web Title: Nanda killed Baji in Benoda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.