शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

#MeToo: नाना असभ्य आहे, पण 'तसलं' काही करणार नाही- राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 11:45 IST

राज ठाकरेंकडून नाना पाटेकर यांची पाठराखण

अमरावती: अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या आरोपांमुळे सध्या अभिनेते नाना पाटेकर वादात सापडले आहेत. तनुश्री दत्तानंनाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. मात्र नाना पाटेकर महिलेशी गैरवर्तन करेल असं वाटत नाही, असं मनसेप्रमुख राज ठाकरेंनी म्हटलं आहे. नाना पाटेकर कितीही खराब असला, तरीही महिलेसोबत गैरवर्तन करणार नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी नानांची पाठराखण केली. राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी नाना पाटेकर यांच्यावर झालेल्या आरोपांवर भाष्य केलं. नाना पाटेकर विचित्र गोष्टी करतो, याची मला कल्पना आहे. तो असभ्य माणूस आहे. मात्र असं असलं तरी तो महिलेशी गैरवर्तन करणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले. या प्रकरणात न्यायालय निकाल देईल. त्यामुळे आपण फक्त आरोपांवरुन कोणाला दोषी धरु नये, असं आवाहन राज यांनी केलं. 'मी नाना पाटेकर यांना ओळखतो. तो असभ्य आहे. तो विचित्र गोष्टी करतो. मात्र तो असं काही करेल, असं मला वाटत नाही. यामध्ये न्यायालय योग्य निकाल देईल. आपण त्यावर निकाल देऊन कोणाला दोषी धरु नये,' असं राज ठाकरे म्हणाले. तनुश्री दत्तानं नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केल्यानंतर चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्री, दिग्दर्शिका, लेखिका यांनी त्यांच्यावरील अत्याचारांना वाचा फोडली. याशिवाय महिला पत्रकारांनीदेखील त्यांच्यासोबत झालेल्या अत्याचारांवर भाष्य केलं. त्यामुळे सोशल मीडियात #MeToo अभियान सुरू झालं. यावरही राज ठाकरेंनी भाष्य केलं. 'मी टू हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. त्यावर ट्विटरवर होणारा वाद मात्र योग्य नाही,' असं राज यांनी म्हटलं. देशात सध्या अनेक महत्त्वाचे विषय आहेत. इंधनाचे वाढते दर, रुपयाचं घसरतं मूल्य, बेरोजगारी हे चिंताजनक मुद्दे आहेत. त्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी मी टू अभियान सुरू करण्यात आलं असावं, असा संशय त्यांनी व्यक्त केला.  

टॅग्स :Nana Patekarनाना पाटेकरTanushree Duttaतनुश्री दत्ताRaj Thackerayराज ठाकरेMetoo Campaignमीटू