मुद्रा लोन काढण्याच्या नावावर युवकाला १.८४ लाखांनी गंडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:14 IST2021-04-08T04:14:01+5:302021-04-08T04:14:01+5:30

अमरावती : मुद्रा लोन काढण्याकरिता फिर्यादीने ऑनलाईन सर्च केले असता, आरोपीने युवकाकडून वेगवेगळी कारणे सांगून १ लाख ८४ हजार ...

In the name of taking out a currency loan, the youth lost Rs 1.84 lakh | मुद्रा लोन काढण्याच्या नावावर युवकाला १.८४ लाखांनी गंडविले

मुद्रा लोन काढण्याच्या नावावर युवकाला १.८४ लाखांनी गंडविले

अमरावती : मुद्रा लोन काढण्याकरिता फिर्यादीने ऑनलाईन सर्च केले असता, आरोपीने युवकाकडून वेगवेगळी कारणे सांगून १ लाख ८४ हजार ७८० रुपये भरण्यास सांगून लोन दिले नाही व आर्थिक फसवणूक केल्याची घटना जावरकर नगरातील सपकाळ ले-आटमध्ये २८ जानेवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान घडली. याप्रकरणी शहर सायबर पोलिसांनी मंगळवारी गुन्हा नोंदविला.

फिर्यादी योगेश रामेश्वर चुनारकर (३३, रा. जवाहरनगर) यांनी सायबर सेलकडे तक्रार नोंदविली. त्यावरून पाच विविध मोबाईलधारक व एका बँक खाते क्रमांकाधारकाविरुद्ध पोलिसांनी भादंविचे कलम ४१९, ४२०, सहकलम ६६(सी), ६६ (ड) आयटी ॲक्टनुसार गुन्हा नोंदविला. फिर्यादी यांना पैशाची आवश्यकता असल्याने त्यांनी मुद्रा लोन करीत ऑनलाईन सर्च केले. मात्र, आरोपी मोबाईलधारक तसेच बँक खातेधारकाने युवकाला वेगवेगळी कारणे सांगून फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच युवकाने पोलिसांत धाव घेतली. पुढील तपास सायबर सेलचे पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर करीत आहेत.

Web Title: In the name of taking out a currency loan, the youth lost Rs 1.84 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.