पीडीएमसीत नोकरी लावून देण्याच्या नावावर १४ जणांना सव्वा लाखांनी गंडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:11 IST2021-07-08T04:11:06+5:302021-07-08T04:11:06+5:30
अमरावती : पीडीएमसी रुग्णालयात गार्डची नोकरी लावून देतो, अशी बतावणी करून १४ जणांना १ लाख १९ हजारांनी गंडविल्याची धक्कादायक ...

पीडीएमसीत नोकरी लावून देण्याच्या नावावर १४ जणांना सव्वा लाखांनी गंडविले
अमरावती : पीडीएमसी रुग्णालयात गार्डची नोकरी लावून देतो, अशी बतावणी करून १४ जणांना १ लाख १९ हजारांनी गंडविल्याची धक्कादायक घटना चपराशीपुरा कॅम्प रोड येथे २ जानेवारी ते ६ जुलै दरम्यान घडली.
पोलीस सूत्रांनुसार, संदीप पाडुरंग मोरे (४२, रा. न्यू कॉलनी ) असे आरोपीचे नाव आहे. दिलीप विनायक जाधव (४५, रा. चिरोडी ता. चांदूर रेल्वे) यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली. आरोपीने त्यांच्या दोन्ही मुलांना पीडीएमसीत येथे गार्डची नोकरी लावून देतोे, प्रत्येकी १२ हजार पगार राहील, असे सांगून २ जानेवारी २०२१ रोजी अर्जदाराकडून २० हजार घेतले. पीडीएमसीत क्लर्क व अन्य ३० ते ४० जागा उपलब्ध असून, प्रत्येकी १० ते ११ हजार पगार राहील, असे सांगितले. फिर्यादीने विश्वासातील १४ लोकांचे मिळून १ लाख १९ हजार रुपये जमा करून दिले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.