ग्रामपंचायत सभागृहाला माजी सरपंचाचे नाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:11 IST2021-06-04T04:11:44+5:302021-06-04T04:11:44+5:30

सभागृहाला नाव माजी सरपंचाला अर्पण केली अनोखी श्रद्धांजली फोटो पी ०३ धामणगाव धामणगाव रेल्वे : तालुक्यातील जुना धामणगावचे माजी ...

Name of the former Sarpanch to the Gram Panchayat Hall | ग्रामपंचायत सभागृहाला माजी सरपंचाचे नाव

ग्रामपंचायत सभागृहाला माजी सरपंचाचे नाव

सभागृहाला नाव माजी सरपंचाला अर्पण केली अनोखी श्रद्धांजली

फोटो पी ०३ धामणगाव

धामणगाव रेल्वे : तालुक्यातील जुना धामणगावचे माजी सरपंच दिवंगत प्रवीण गुल्हाणे यांच्या आठवणींना उजाळा देत नवनिर्वाचित सरपंच विश्वेश्वर दिघाडे व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायत कार्यालय जुना धामणगावच्या सभागृहाला त्यांचे नाव देऊन अनोखी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

प्रवीण गुल्हाणे यांचे जळगाव येथे सरपंच परिषदेला जाताना अपघातात निधन झाले होते. नामकरण सोहळ्याला सरपंच विश्वेश्वर दिघाडे, उपसरपंच हर्षा मनोज तायडे प्रफुल ढाले, अतुल वेलुकार, नितेश गंधे, ऋषी जगताप, सतीश भलावी, शीतल तेलंगे, वर्षा महातमे, आशा ढोके यांच्यासह ग्राम विकास अधिकारी राजू अहिरवार आदी उपस्थित होते.

Web Title: Name of the former Sarpanch to the Gram Panchayat Hall