नाला खोलीकरणाचे काम थांबले बरेच काम बाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:10 IST2021-07-08T04:10:22+5:302021-07-08T04:10:22+5:30
स्वातंत्र्यपूर्व काळापासून रामापूर व पथ्रोट या गावांच्या मध्यभागातून वाहणाऱ्या नाल्यात घाणीचे साम्राज्य कायम आहे. गाळाने तो उथळ झाला. सहा ...

नाला खोलीकरणाचे काम थांबले बरेच काम बाकी
स्वातंत्र्यपूर्व काळापासून रामापूर व पथ्रोट या गावांच्या मध्यभागातून वाहणाऱ्या नाल्यात घाणीचे साम्राज्य कायम आहे. गाळाने तो उथळ झाला. सहा किलोमीटर लांबीच्या या नाल्यावर कायमस्वरूपी पूल, रस्ता होऊन या समस्येवर तोडगा निघावा, याकरिता अनेक वेळा प्रयत्न झाले. अशातच थोडीफार बांधकामाची सुरुवात झाल्यावर त्यावर आक्षेप घेत सदर प्रकरण हे न्यायालयात पोहोचले होते. तेथे मिळालेल्या निकालानंतर नाला बांधकामासंदर्भात काही सूचना न्यायालयामार्फत करण्यात आल्या होत्या. परंतु त्यानंतर बांधकामच बंद पडल्याने त्यावर अंमलबजावणी झालीच नाही. अशातच दीड वर्षापूर्वी विधानसभा निवडणुकीत नाला बांधकामासंदर्भात पुन्हा एकदा आश्वासन मिळाले. राज्यमंत्री बच्चू कडूंसह स्थानिक आमदारानी नाला विकासाची स्वप्ने दाखविली. त्यानुसार सुरुवातीला पूर नियंत्रण रेषा ठरविण्यासाठी नाल्याचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर आमदार व राज्यमंत्र्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेत दौरा करून संपूर्ण नाल्याची पाहणी केली. त्यावेळी आधी नाला खोलीकरण करून घेणे गरजेचे असल्याचे सांगून सदर कामासाठी एक पोकलेन व टिप्पर पाठविले होते. त्यावेळी रामापूर हद्दीतून नाला खोलीकरणास सुरुवात झाल्यावर पथ्रोट हद्दीचे काम सुरू करताना वापरात असलेले पोकलेन हे लहान असल्याने व्यवस्थित काम होत नसल्याची ओरड झाली होती. म्हणून पाटबंधारे विभागाच्या तांत्रिक विभागाने मोठे पोकलेन उपलब्ध करून दिले होते. मोठ्या पोकलेनच्या आधारे आधीचे १० व नंतर २० अशा महिनाभराच्या कामावर दोन लाख रुपयांचा डिझेल खर्च केल्यानंतर मागील आठवडाभरापासून टिप्पर व पोकलेनची चाके थांबलेली आहेत. त्यांचे ऑपरेटरसुद्धा गावी निघून गेले आहेत.
----------------
जयसिंग सोसायटीमागील भाग व तेलगंखडी मार्गावरील काही भागातील नाला खोलीकरणचे काम करणे शिल्लक आहे. त्यासाठीच दोन्ही वाहन या ठिकाणी ठेवले आहेत. येत्या तीन-चार दिवसांत पुन्हा काम सुरू होईल.
- योगेश मोरे, शाखा अभियंता पाटबंधारे विभाग, अचलपूर