शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

अतिक्रमणात नगरपंचायत नामधारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 5:00 AM

धारणी शहरात एकूण १७ प्रभागांमध्ये १७ नगरसेवक आहेत. आपापल्या प्रभागांत होणाऱ्या घडामोडींकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारी या नगरसेवकांची आहे. मात्र, काही नगरसेवक स्वत: किंवा नातलगांच्या माध्यमाने अतिक्रमणात गुंतले आहेत. कुठल्याही परिस्थितीत शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात येऊ नये, असाच बहुतेकांचा कटाक्ष असतो.

ठळक मुद्देधारणी शहरात अर्थकारण फोफावले : फौजदारीच्या आदेशानंतरही बांधकाम सुरूच

श्यामकांत पाण्डेय।लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : शहर सध्या पूर्णपणे अतिक्रमणात हरवून गेले आहे. पाच वर्षांत नगरपंचायतीने अतिक्रमणधारकांना सवलत दिल्याने मोकळ्या जागांवर बांधकामाचे जाळे विणण्यात आले. या जाळ्यापासून मुख्य मार्गसुद्धा सुटले नाहीत. फौजदारी आदेश देऊनही अवैध बांधकाम थांबत नसल्याने येथील नगरपंचायत नामधारी बनल्याचे चित्र आहे.धारणी शहरात एकूण १७ प्रभागांमध्ये १७ नगरसेवक आहेत. आपापल्या प्रभागांत होणाऱ्या घडामोडींकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारी या नगरसेवकांची आहे. मात्र, काही नगरसेवक स्वत: किंवा नातलगांच्या माध्यमाने अतिक्रमणात गुंतले आहेत. कुठल्याही परिस्थितीत शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात येऊ नये, असाच बहुतेकांचा कटाक्ष असतो. शहराच्या गल्लीबोळात, चौकात इतकेच नव्हे तर मुख्य मार्गावरसुद्धा अतिक्रमणकर्ते राजरोस आपली दुकाने थाटून प्रशासनास वाकुल्या दाखवित आहेत. मुख्य मार्गाची अवस्था तर अशी की, एखाद्या दुकानात प्रवेश करताना अतिक्रमणकर्त्याच्या दुकानासमोर वाहन उभे केल्यास वाहनधारकांना ते बाजूला करण्यापर्यंत अक्षरश: शिवीगाळ केली जाते. अशा अतिक्रमणाला काही नगरसेवकच खतपाणी घालत असल्यामुळे त्यांची मनमानी दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील अतिक्रमण निर्मूलनाची जबाबदारी नगरपंचायतीची आहे. मात्र, तेथील कारभार अर्थकारण आणि राजकारण यापुरता मर्यादित झालेला आहे. सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरलेल्या शहरातील अतिक्रमणाचे नगरपंचायतला सोयरसुतक नाही. प्रभारी मुख्याधिकारी आठवड्यातून दोन दिवसच धारणीत येतात. त्यामुळे त्यांच्याकडून तरी अपेक्षा ठेवावी, असा सवाल धारणीकर करीत आहे.धारणी शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा अत्यंत गंभीर आहे. नगरपंचायत प्रशासनासह सार्वजनिक बांधकाम आणि पोलीस विभागांकडून अतिक्रमणधारकांविरुद्ध कार्यवाही करण्यासाठी लवकरच पावले उचलली जाणार आहेत.- मिताली सेठी,सहायक जिल्हाधिकारी, धारणीमागील आठवड्यात पहिल्यांदा धारणी शहराची पाहणी करण्यात आली. अतिक्रमण हा शहरातील प्रमुख मुद्दा असल्याचे जाणवले. हळूहळू अतिक्रमण हटविण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल.- सुधाकर पानझडे, प्रभारी मुख्याधिकारी, नगरपंचायतधारणी शहराच्या अतिक्रमणाबाबत आम्ही नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासून गंभीर आहोत. शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी सभागृहात आवाज उचलला. परंतु, याकडे सत्ताधारी पक्ष डोळेझाक करीत आहे. अतिक्रमण निर्मूलन कारवाईस संपूर्ण सहकार्य राहील.- क्षमा चौकसे, विरोधी पक्षनेता, नगरपंचायत, धारणी