बेलोरा येथे नाफेडच्या चणा खरेदीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:23 IST2021-03-13T04:23:21+5:302021-03-13T04:23:21+5:30
चांदूर बाजार : तालुक्यातील बेलोरा येथे १५ फेब्रुवारीपासून नाफेडची चणा खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली होती. त्यानुसार ...

बेलोरा येथे नाफेडच्या चणा खरेदीला सुरुवात
चांदूर बाजार : तालुक्यातील बेलोरा येथे १५ फेब्रुवारीपासून नाफेडची चणा खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली होती. त्यानुसार बेलोरा फार्मर प्रोड्यूसर कंपनीतर्फे तेथील केंद्रावर चणा खरेदीला प्रत्यक्ष सुरुवात झाली. यावेळी अजय तायडे हे चणा विक्री करणारे पहिले शेतकरी ठरले.
यंदा खुल्या बाजारात चण्याचे दर कमी असल्याने अनेक शेतकऱ्यांनी शासकीय चणा खरेदीकडे नोंद केली आहे. शासकीय दरानुसार शेतकऱ्यांचा चणा ५१०० रुपये प्रतिक्विंटलने खरेदी सुरू आहे.
बेलोरा येथे शेतकऱ्यांचा चणा विक्रीसाठी ४२१ शेतकऱ्यांनी बेलोरा फॉर्मर प्रोड्युसर कंपनीकडे नोंदणी केली होती. त्यानुसार राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते नोंदणी केलेल्या चण्याच्या शासकीय खरेदीचा शुभारंभ झाला. यावेळी सरपंच दीपाली गोंडीकर, बाजार समिती संचालक मंगेश देशमुख, सचिन पावडे, बंटी उतखेडे, तुषार देशमुख, स्वप्नील भोजने, श्याम कडू, गौरव झगडे, विधाते, भय्या ठाकरे व विदर्भ मार्केटिंग फेडरेशनचे जिल्हा पणन अधिकारी उमेश देशपांडे उपस्थित होते.
------------