NAC enrollment of 34 colleges pending | ३४ महाविद्यालयांचे नॅक नामांकन रखडले

३४ महाविद्यालयांचे नॅक नामांकन रखडले

ठळक मुद्देऑगस्टमध्ये यूजीसी चमूद्वारे होणार पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क 
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत ३४ अनुदानित महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन लॉकडाऊनमुळे रखडले आहे. यापूर्वी या महाविद्यालयांना नॅकसाठी मार्च २०२० ही डेडलाइन देण्यात आली होती. मात्र, आता यूजीसीने पुढाकार घेत ऑगस्टमध्ये मूल्यांकन घेण्याचे निश्चित केले आहे.
विद्यापीठाशी संलग्न १५२ अनुदानित महाविद्यालये आहेत. त्यापैकी ३४ महाविद्यालयांनी राष्ट्रीय मूल्यांकन व प्रत्यायन परिषद (नॅक) ची मान्यता मिळविली नव्हती. राज्य शासनाच्या ८ आॅक्टोबर २०१० च्या निर्णयानुसार या महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत नॅक नामांकन आवश्यक केले होते. त्याअनुषंगाने उच्च व तंत्र शिक्षण विभागाने संंबधित महाविद्यालयांचे प्राचार्य, संस्थाप्रमुखांना स्मरणपत्रही दिले होते. त्यानुसार कार्यशाळासुद्धा घेण्यात आल्या आहेत. मात्र, लॉकडाऊनमुळे नॅक रखडले आहे.
अकोला येथील सुधाकरराव नाईक महाविद्यालय, वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथील वसंतराव नाईक महाविद्यालय, यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील जिजामाता महाविद्यालय, तर पांढरकवडा येथील शिवाजीराव मोघे महाविद्यालयांचे नॅक नामांकनासाठी प्रस्ताव सादर आहेत.


अगोदर दोन महाविद्यालयांचे नॅक झाले आहे. चार महाविद्यालयांचे प्रस्ताव प्राप्त झाले असताना, लॉकडाऊनमुळे चमूला पाहणी करता आली नाही. या चारही महाविद्यालयांना यूजीसीकडून नॅक मूल्यांकनासाठी ऑगस्ट महिन्यात तारीख देण्यात आली आहे. त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल.
- केशव तुपे, सहसंचालक, उच्च व तंत्र शिक्षण अमरावती.

Web Title: NAC enrollment of 34 colleges pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.