अभाविपचे माझा अनुभव, माझे मत सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:14 IST2021-03-23T04:14:51+5:302021-03-23T04:14:51+5:30
अमरावती : अभाविपने सोमवारपासून सुरू केलेल्या माझा अनुभव, माझे मत सर्वेक्षणास विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे विद्यापीठ, महाविद्यालयीन ...

अभाविपचे माझा अनुभव, माझे मत सर्वेक्षण
अमरावती : अभाविपने सोमवारपासून सुरू केलेल्या माझा अनुभव, माझे मत सर्वेक्षणास विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे विद्यापीठ, महाविद्यालयीन स्तरावर समस्या सोडविण्याच्या या अभिनव उपक्रमाने सुकर होईल, अशी माहिती प्रसिद्धीप्रमुख प्रतीक धामोरीकर यांनी दिली.
----------------
विद्यापीठाच्या अभियांत्रिकी परीक्षांना प्रारंभ
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी व तांत्रिकी परीक्षांना सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. पहिल्या दिवशी व्यवस्थितपणे परीक्षा आटोपल्याची माहिती आहे. विद्यापीठ संलग्नित २३ अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे.
----------------------
शिक्षण मंडळासमोरील साखळी उपोषण स्थगित (फोटो घेणे)
अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सन २०१९ मध्ये घेतलेल्या कनिष्ठ लिपिक पदभरतीत नियुक्त उमेदवारांना न्याय मिळण्यासाठी सोमवारपासून आरंभलेले साखळी उपोषण तूर्त स्थगित केले आहे. त्यानुसार विभागीय शिक्षण मंडळा्चे अध्यक्ष शरद गोसावी यांना उपोषकर्त्यांनी निवेदन सादर केले.